19/10/26
Breaking News

सेलू येथील मुंजाबा महाराज मंदिर कामकाज बांधकामाचे पूजन

सेलू( प्रतिनिधी )
येथील सेलू परभणी रोडवरील न प च्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळ असलेल्या अत्यंत
पुरातन मुंजाबा महाराज मंदिरचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच मंदिर च्या छताच्या कामास सुरुवात केली जाणार आहे.रविवारी (दि.18) प पु भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या हस्ते मुंजाबा महाराज यांची विधिवत पूजा करून कामाच्या अंतिम टप्प्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी अँड कृष्णा शेरे, कै राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाचे संचालक ज प्रल्हाद किशनराव कान्हेकर ,दत्तात्रय टोलमारे, विष्णुपंत शेरे, राजू शेरे, विक्की शेरे, लखन कान्हेकर , अश्विन टोलमारे, अश्विन शहाणे , रामेश्वर शेरे, महादेव शेरे, सचिन शेरे, केशव शेरे आदींची उपस्थिती होती .
मा ना मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी या मंदिराच्या सभा मंडपासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 9 लक्ष 40 लाख रुपये निधी मंजूर केला असून उर्वरित सभा मंडपाचे बांधकाम लोकवर्गणीतून पूर्ण होणार आहे.
येथे भव्य दिव्य असा 26 बाय 46 सभा मंडपाचे काम हाती घेण्यात आले असून पायाभरणी व कॉलम चे कामकाज पूर्ण झाले असून येत्या 20 दिवसाच्या आत सभा मंडपावर छत टाकल्या जाणार आहे अशी माहिती मुंजाबा महाराज मंदिर बांधकाम समितीच्या वतीने अँड कृष्णा शेरे यांनी दिली आहे

Check Also

गोपाळकाला आनंदोत्सव व समाधानाचे प्रतीक -ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालूरकर

सेलू,दि 18 (प्रतिनिधी)ः सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र वालूर येथे वै. प. पु. ह.भ.प.अण्णासाहेब महाराज वालूरकर यांच्या …