19/10/26
Breaking News

सरस्वती प्राथमिक विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा

हिंगोली, ( दि. १८ )
जवळा बाजार येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयात जागतिक हात धुवा दिना निमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पूरजळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
​या प्रसंगी आरोग्य सेवक प्रसेनजित दातार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे हात धुण्याच्या योग्य पद्धती दाखवल्या. दैनंदिन जीवनात आणि जेवणापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत पटवून दिले.
​कुष्ठरोग व जंतनाशक मोहिमेबाबत जनजागृती
​या उपक्रमादरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग जनजागृती करण्यात आली. कुष्ठरोगाची लक्षणे, त्यावरील उपचार आणि वेळेवर निदान होण्याचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
​तसेच येत्या २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. जंतनाशक गोळ्यांचे सेवन केल्याने मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि कुपोषण व ॲनिमियासारख्या आजारांपासून बचाव होतो, असे यावेळी सांगण्यात आले.
​ सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.

Check Also

सेलू येथील मुंजाबा महाराज मंदिर कामकाज बांधकामाचे पूजन

सेलू( प्रतिनिधी ) येथील सेलू परभणी रोडवरील न प च्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळ असलेल्या अत्यंत …