औंढा नागनाथ,दि 09
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर तानाजी जोगदंड यांनी दि. 8 नोव्हेंबर 2026 रोजी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी आज दि. 9 नोव्हेंबर 2026 रोजी मयताचे भाऊ लक्ष्मण तानाजी जोगदंड, वय 20 वर्ष यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात खबर दिली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केल्याचे खबरमध्ये म्हटले आहे.
या खबरवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घुगे हे करीत आहेत.
या घटनेमुळे शिरड शहापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
Shabdraj www.shabdraj.com