11/11/26
Breaking News

वाघाळा येथे ५० टक्के अनुदानावर ११ पशुपालकांना कडबा कुट्टी संयंत्रांचे वाटप

पाथरी (प्रतिनिधी)
विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत वाघाळा येथे सोमवारी 9 रोजी पशुपालकांना ५० टक्के अनुदानावर कडबा कुट्टी संयंत्रांचे वाटप करण्यात आले. विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प संचालक डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
पशूधन विकास अधिक मजबूत करणे आणि पशुपालकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंचायत समिती पाथरीचा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, पशुचिकित्सालय वाघाळा आणि इंद्रायणी दूध संकलन केंद्र वाघाळा यांच्या संयुक्त पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पाथरी पंचायत समितीचे उपसभापती सचिन अंभोरे, वाघाळा पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे प्रमुख डॉ. के. एन. जाधव, इंद्रायणी दूध संकलन केंद्राच्या चेअरमन आणि नागोराव घुबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ लाभार्थी पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्रे सुपूर्द करण्यात आली. यंत्र मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी यावेळी मोठे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास भागवतराव घुबरे, नानासाहेब घुबरे, विश्वनाथ रंगनाथ नवल, विक्रम जाधव, अशोकराव भिसे, हनुमान दिवटे, शाहू नवघरे, गणेश घुबरे, रामभाऊ टरफले, कृष्णा रंगनाथ शेट यांच्यासह वाघाळा पशु चिकित्सालयाचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ ओमकार महात्मे, कल्याण घोडके आणि मोठ्या संख्येने शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, उर्वरित सर्व पशुपालकांनीही या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय चिकित्सालय वाघाळा केंद्राचे प्रमुख डॉ. के. एन. जाधव यांनी केले.

Check Also

बँकेच्या ऑनलाईन घोळात शेतकरी कर्जमाफी पासून वंचित, जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार

सेलू (प्रतिनिधी ) बँकेकडून करण्यात आलेल्या ऑनलाईन च्या घोळात सेलू येथील शेतकरी बापूसाहेब रामराव शेरे …