11/11/26
Breaking News

बँकेच्या ऑनलाईन घोळात शेतकरी कर्जमाफी पासून वंचित, जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार

सेलू (प्रतिनिधी )
बँकेकडून करण्यात आलेल्या ऑनलाईन च्या घोळात सेलू येथील शेतकरी बापूसाहेब रामराव शेरे यांच्या वर शासनाच्या कर्जमाफी योजनेतून वंचित राहण्याची वेळ आली असल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकारी ,परभणी व सहायक निबंधक ,सेलू यांच्या कडे लेखी तक्रार करून न्याय मिळावा अशी विनंती केली आहे .

येथील शेतकरी बापूसाहेब रामराव शेरे यांची सेलू शिवारात गट क्रमांक ५९ मध्ये ९३ आर शेती आहे .व त्यांनी सदरील शेतीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सेलू कडून पीक कर्ज घेतलेले होते . त्यांचा बँकेतील खाते क्रमांक ३९६१५७५३६३० हा आहे .

महाराष्ट्र शासनाने नुकतीच राज्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर केली .व त्यासाठी सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे .

त्यानुसार आपल्याला देखील या योजनेत पीक कर्ज माफीचा लाभ मिळावा यासाठी बापूसाहेब शेरे यांनी दिनांक ३९/७/२६ रोजी आधार कार्ड प्रमाणीकरण साठी त्यांचा आधार क्रमांक ५१५४६८९९४७६३ हा टाकल्या नंतर त्यावर नागपूर जिल्ह्यातील मोदा तालुक्यातील वसंत बन्सीधर चावण हे नांव आले असून त्यावरील कर्ज खाते क्रमांक तसेच कर्जाच्या रकमेत देखील तफावत दिसून येत आहे .ज्याचा वैशिष्ठ्य क्रमांक १५५४८४००३९८० असा दर्शवला जात आहे .
आधार क्रमांक वरील नावं ,खाते क्रमांक तसेच कर्जाच्या रकमेत तफावत येत असल्यामुळे आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे बापूसाहेब रामराव शेरे यांना शासनाच्या या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे .विशेष म्हणजे याच गटनंबर मधील त्यांच्या पत्नी मीरा बापूसाहेब शेरे यांचे नावं कर्जमाफीच्या यादीत आहे .
बापूसाहेब शेरे यांनी सदरील आधार कार्ड इतर ठिकाणी ऑनलाईन केले असता नावं बरोबर येत आहे .फक्त बँकेच्या पोर्टलवर आधारकार्ड टाकल्यानंतर मात्र नावात बदल होत आहे .
आपली काहींच चूक नसतांना देखील बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे व ऑनलाईन मध्ये झालेल्या घोळा मुळे शेतकऱ्याला शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे .याबत सखोल चौकशी करून मला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती शेरे यांनी जिल्हाधिकारी परभणी ,सहायक निबंधक सेलू व शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया ,शाखा सेलू यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .

Check Also

वाघाळा येथे ५० टक्के अनुदानावर ११ पशुपालकांना कडबा कुट्टी संयंत्रांचे वाटप

पाथरी (प्रतिनिधी) विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत वाघाळा येथे सोमवारी 9 रोजी पशुपालकांना ५० टक्के अनुदानावर …