पाथरी,दि 21 (प्रतिनिधी)ः
पाथरी येथील अजिंठा आर्टचे शिल्पकार प्रकाश दाढेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून थोर महापुरुष व विविध देवदेवतांच्या मूर्ती बनवितात.मात्र त्यांना अद्यापही शासनाच्या वतीने लोककलावंत चे मानधन मिळाले नाही.मानधन शासनाने सुरू करावी अशी मागणी शिल्पकार प्रकाश दाढेल यांनी केली आहे.
पाथरी येथील अजिंठा आर्टचे प्रसिद्ध शिल्पकार प्रकाश दाढेल हे शिल्पकार तथा कलावंत म्हणून ओळखले जाते.त्यांनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्यामार्फत गेल्या २५ वर्षांपासून दगडी मुर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. मी दरवर्षी वृध्द साहित्यिक व वृद्ध कलावंत म्हणून मानधनसाठी अर्ज शिल्पकलेच्या माध्यमातून आँनलाईन पध्दतीने मानधन संदर्भात अर्ज दाखल करण्यात आला आहे. अजुनही लोककलावंत मानधन मिळाले नाही.मी अनेक वेळा यासंदर्भात पाठपुरावा केला आहे.मला अद्यापही शासनाच्या वतीने लोककलावंत मानधन मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. शिल्पकलेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, गौतम बुद्ध यांच्या अनेक थोर महापुरुष दगडी कोरीव मुर्ती बनविली आहेत.त्याचबरोबर हनुमान, गणपती, महादेव,नंदी,पिंड, दत्तात्रय,लक्ष्मी,महाकाली यांच्या अनेक देवदेवतांच्या काळ्या पाषाण दगडावर कोरीव शिल्पकाम केले आहे शासनाच्या नृत्य,शिल्पकला, चित्रकला लोकगीत,या क्षेत्रात सामाजिक, प्रबोधनात्मक , सामाजिक जनजागृती कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानधन व सन्मान केला जातो.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पकार प्रकाश दाढेल हे मानधन वंचित राहिले आहेत. शासनाने तात्काळ मानधन मंजूर करावे आशी मागणी शिल्पकार प्रकाश दाढेल यांनी केली आहे.
Shabdraj www.shabdraj.com