परभणी,दि.21(प्रतिनिधी) : परभणी ते मानवत या राष्ट्रीय महामार्गावरील पेडगांव फाटा ते पेडगांव रेल्वेस्थानकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अक्षरशः भयावह झाली असून जिल्हा परिषद प्रशासनाने या रस्त्याच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी पेडगांव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सोमवारी सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची ये-जा आहे. परंतु, रस्ता पूर्णतः उखडला आहे. आदळ आपट केल्याशिवाय वाहनधारकांना पर्याय उरला नाही. या स्थितीत वाहनधारक रस्त्याऐवजी रस्त्याच्या बाजूने जीव मुठील घेवून ये-जा करीत आहेत. पावसाळ्यात तर काळ्या मातीतून ये-जा करतांना वाहनधारकांना मोठ्या कसरतील कराव्या लागत आहेत. या स्थितीची आपण दखल घ्यावी व तातडीने रस्त्याच्या मजबुतीकरणाचं काम सुरु करावं, अशी मागणी सरपंच श्रीमती सविताबाई अशोकराव हरकळ, उपसरपंच सौ. राजश्री गोपाळराव देशमुख व ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
Shabdraj www.shabdraj.com