रमेश बिजुले
पाथरी,दि 23 ः
पाथरी तालुक्यातील उमरा येथील देवी मंदिर संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी महोत्सवानिमित्त 22 रोजी देवी मंदिर उमरा येथे श्री ह भ प एकनाथ महाराज शिंदे कानसुरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या कीर्तन सेवेसाठी परिसरातील भजनी मंडळी व गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते महाराजांनी किर्तन सेवेसाठी संत सावता महाराजांचा अभंग घेतला
कांदा मुळा भाजी, अवघा विठाई माझी’ अशा अभंगाद्वारे
आमची माळीयाची जात शेत लाउ बागायत या अभंगावर सुंदर महाराजांनी चिंतन केले श्री ह भ प गणेश महाराज कोल्हे , माऊली महाराज , सिद्धेश्वर महाराज गाढवे , चव्हाण ,भीमराव कोल्हे, प्रकाश कोल्हे ,धनंजय कोल्हे, गावातील सर्व भजनी मंडळी महिला भगिनी मंडळ गौंडगावकर भजनी मंडळी विशेष रूपाने उपस्थित होते.
परिसरातील येथील 23 रोजी संत सावता माळी चारित्र्य वाचन आणि रात्री 9 ते 11 कीर्तन सेवा संपन्न ह भ प एकनाथ शिंदे महाराज कानसुरकर
। ‘कांदा मुळा भाजी, अवघा विठाई माझी’ अशा अभंगाद्वारे आपल्या दैनंदिन कामातच देव शोधण्याचा संदेश देणारे संत सावता माळी महाराज व एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देवी मंदिर उमरा येथील भजनी वारकरी मंडळतर्फे किर्तन सोहळा संपन्न झाला.यांनी सोहळ्यास उपस्थित राहून संत सावता माळी महाराज व एकनाथ महाराज यांना अभिवादन केलं आणि सुमधुर किर्तनाचा श्रवनानंद घेतला.
Shabdraj www.shabdraj.com