परभणी,दि.24(प्रतिनिधी) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात गुरुवार 24 जूलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 62.38 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता.
या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 934.440 दलघमी असून, यामध्ये 124.670 दलघमी हा मृत साठा आहे, तर 809.770 दलघमी जिवंत साठा मानला जातो. सद्यस्थितीत धरणात 505.104 दलघमी जिवंत साठा असून, एकूण पाणीसाठा 629.774 दलघमी इतका झाला आहे. यामुळे येलदरी धरण सध्या 62.38 टक्के क्षमतेने भरलेले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये धरणात 10.950 दलघमी स्थानिक पाण्याची आणि 110.160 दलघमी एकूण जलआवक झाली आहे. याच कालावधीत परिसरात 37 मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पावसाचा आकडा 245 मिमीवर पोहोचला आहे, अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी दिली.
Shabdraj www.shabdraj.com