मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, जवळपास 8 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाजनांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा
या सर्व चर्चांदरम्यान, भाजपचे संकटमोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बाजूला करत त्यांना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Shabdraj www.shabdraj.com