04/02/26
Breaking News

कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने आनंद विद्यालयात विद्यार्थ्यांना किट वाटप

परभणी, दि. २८ (प्रतिनिधी)ः
शहरातील पिंगळी रस्त्यावरील  आनंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  आयटीआय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्यविकास किट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष  शिवाजी भरोसे यांच्या हस्ते १४०० किटपैकी २०० किटचे वाटप करण्यात आले.
आयटीआय आयएमसी सदस्य व समाजभूषण प्रा. सौ. रमाताई शेजावळे, तसेच नांदेड येथील कौशल्य विकास मंत्रालयाचे समन्वयक  सचिन नरंगाळे यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शेळके , मुख्याध्यापक श्री. श्रीधर कोके  होते.
शाळेतील शिक्षकवृंद आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये भालचंद्र गोरे, प्रभावती अन्नपूर्वे, रूपाली ठाकरे, मनीषा जाधव, संतोष जाधव, भागवत भरोसे, बाळासाहेब कदम , ठोंबाळ , शिरसाट , शिंदे , खूपसे , बेंद्रे , प्रवीण गायकवाड सर, पांडुरंग भरोसे, चकोर , राऊत , डाके , आढे सर, झाडे सर यांचा समावेश होता.
या उपक्रमाअंतर्गत एकूण १४०० किटचे वाटप नियोजित असून, उर्वरित किट येत्या आठवड्यात परभणी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी दिली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी एक प्रभावी पाऊल ठरून त्यांना आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध करून देणारा आहे. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

 

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …