पाथरी,दि 30 प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाथरी तालुकाप्रमुखपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा धार्मिक, सामाजिक,राजकीय कामात अग्रेसर असलेले शेतकरी पुत्र एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.शिवसेना नेते सईद खान यांच्या वतीने त्यांची थेट निवड करत त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे.सर्वच क्षेत्रातील लोकांशी संबंध असल्याने एकनाथ शिंदे यांच्या या निवडीमुळे शिवसेनेला याचा निश्चितच संपूर्ण तालुक्यात फायदा होणार आहे.
राजकारणाचा दांडगा अभ्यास आणि हरिभक्त पारायण असल्याने बोलण्याची साधी सरळ आणि काळजात घर करणारी शब्दशैली यामुळे कानसूरचे भूमिपुत्र असलेले एकनाथ शिंदे सर्वांच्या ओळखीचे आणि आपलेसे वाटणारे आहेत.या निवडीनंतर नवनिर्वाचित शिवसेना पाथरी तालुकाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेते सईद खान,असेफ खान,मुंजाजी भाले पाटील,नाना टाकळकर,पप्पू घाडगे,सदाशिव थोरात,युसूद्दीन अन्सारी,अमोल भाले,शाकेर सिद्दीकी,लालू खान,अलोक चौधरी,ताजू बाबा,इरफान शेख,साजेद राज,खालेद दादा, देवा इंगळे, शिवाजी इंगळे इत्यादीसह सर्वच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
Shabdraj www.shabdraj.com