हिंगोली,दि 03
सायकल चालवा, भविष्य घडवा’, ‘पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा’,’झाडं लावू या.. जगवू या ‘, ‘ आपली हिंगोली ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोली ‘अशा गगनभेदी घोषणा देत, जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगोली शहरात पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने आज एका भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीची सुरुवात शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली.
मुख्य मार्गांवरून जनजागृती
करत ही सायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यामध्ये पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा गांधी चौक, पीपल्स बँक, जिल्हा परिषद रोड,जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता आणि नगर पालिके समोरून मार्गस्थ होत एन.टी.सी. (NTC) परिसरामध्ये आली. या रॅलीचा अतिशय उत्साही वातावरणात समारोप करण्यात आला. संपूर्ण मार्गावर सायकलस्वारांनी दिलेल्या पर्यावरण आणि आरोग्य विषयक घोषणांनी शहर दणाणून सोडले होते.
या पर्यावरणपूरक उपक्रमात हिंगोलीतील नामांकित डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये डॉ. यशवंत पवार, डॉ. राम मुंडे, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी डॉ.अभयकुमार भरतीया, डॉ. नाकाडे,डॉ. शाह,डॉ. झडपे,डॉ. पिंगळकर, डॉ. प्रेमेन बोथरा,डॉ. गजानन शिंदे,संजय घन, गणेश पाटील, विनोद खरात, विजय ठाकरे, प्रजय कान्हेड, प्रवीण काळबांडे, रमेश सानप, विठ्ठल जाधव, मारोती बोबडे,किरण लाहोटी, रत्नाकर महाजन, विठ्ठल गवळी,शिवचरण ठाकूर, संतोष बाऱहाटे, गजानन घुगे, राजेश पांडे, विवेक वाकडे, अविनाश बोथीकर, निलेश सोनी, विश्वासराव नायक,नरेश अग्रवाल सारिका कयाल, ज्योती वाघमारे, संगीता चौधरी, मनीष पिंगळकर, मंगेश पिंगळकर, गौरव पिंगळकर, आशिष दोडल, निलेश बज, कांतराव गुंडेवार,निलेश अग्रवाल,नैणवानी,लामदाढे यांच्यासह शहरातील असंख्य नागरिक, तरुण, तरुणीआणि बालकं सायकलसह सहभागी झाले होते.
आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देऊन
आजच्या आधुनिक युगात वाहनांच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषण वाढत चालले आहे. याला पर्याय म्हणून आणि स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा, नैसर्गिक, देशी झाडं लावावी, जगवावी, पाऊसपाणी संकलन कराव, सिंगल वापर प्लास्टिकचा वापर बंद करावा, कचरा जाळू नये, तो घंटा गाडीतच टाकावा.. हा मोलाचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून हिंगोलीकरांना देण्यात आला. पर्यावरण प्रेमींच्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

Shabdraj www.shabdraj.com