06/06/26
Breaking News

भाजपा जनसंपर्क कार्यालयात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना अभिवादन

हिंगोली,दि 03 (प्रतिनिधी) ः
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बहुजनांचे कैवारी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी हिंगोली येथिल भाजपा जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी संघटन मंत्री रेणुकादास देशमुख यांनी मुंडे साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला गोपीनाथरावजी मुंडे यांनी बहुजन समाज आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेले कार्य आणि त्यांचा संघर्ष कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील,अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,युवानेते शशिकांत वडकुते, जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे,जिल्हा सरचिटणिस सुनिताताई मुळे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,शहराध्यक्ष रजनीश पुरोहित,कार्याध्यक्ष पवन उपाध्ये,नगरसेवक उमेश गुठ्ठे,राजेश गोटे,बाबाराव घुगे,रामेश्वर गायकवाड,मनोज शर्मा,कैलाश श्रिनाथ,नरेश अग्रवाल,सदाशिव सुर्यतळ,सुनिल राठौर समिर भिसे, संदीप वाकडे,श्रीरंग राठोड,निखील बांगर,गुड्डू देवकते,संतोष साबळे,अमित रुहाटिया,सचिन व्यास,राहुल शिंदे,शेख अतीक,गोवींद करहाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पाणी फाउंडेशनच्या वतीने डिग्रस येथे जनजागृती

हिंगोली,दि 23  सिने अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन च्या वतीनेदिनांक 22 मे रोजी डिग्रस …