26/04/26
Breaking News

स्त्री-पुरुष समानतेची शिकवण देणारा अनुभव मंडप-आशिष साडेगावकर.

सेलू (प्रतिनिधी )
समाजसेवा व स्वकष्टाने जीवन जगणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. कोणी जन्माने मोठा नाही तर तो कर्माने मोठा असतो. सामाजिक समतेचे वचन कोणालाही तू कोण ? आहे असे विचारू नका. प्रत्येकाला आपलं माना अनुभव मंडप जगातील पहिली संसद निर्माण करून समता , स्त्री पुरुष समानता, ही बाराव्या शतकात सांगणारे वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रवर्तक, समता, बंधुता, श्रमाचे महत्त्व रुजवण्याचे मोठे कार्य करत . केवळ एका समाजासाठी काम न करता सर्व समाजासाठी त्यांनी आपले जीवन समर्पण केले. त्याग कष्ट समतेचा विचार देणारे महात्मा बसवेश्वर हे सर्वांसाठी एक आदर्शवत पुरुष होते. जात ही मोठी नसून माणसाचे विचार फार मोलाचे असतात . माणुसकी आणि माणुसकीचा धर्म सांगणारे बसव विचार आज प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले आहेत .असे प्रतिपादन शंकरलिंग मंदिरच्या वतीने आयोजित जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेत आशीष साडेगावकर यांनी केले.
आपलं कार्य करीत असताना ते सत्कारणी लागले पाहिजे असं कार्य करीत रहा. चुकिचं आणि गैरसमजातून भक्ती न करता देवाला समर्पित अशी भक्ती करा . कोण काय सांगतो यापेक्षा शिवमहापुराण ग्रंथ वाचून त्यात सांगितलेली खरी भक्ती करा.आपण स्वतः देव आहोत हे प्रथम लक्षात घ्या . जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांनीच आपल्याला आत्मलिंग शरिरावर धारण करून पवित्र जीवन जगायला शिका. जात पोटजात हा भेदाभेद न करता आपण सर्व माणसं आहोत. जात या संकुचित विचारात न अडकता माणसासाठी माणुसकी हा धर्म जपा. प्रामाणिक आणि कष्टांचा बळावर आपण आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे असं प्रमुख अतिथी म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा बोंधणे बोलत होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रेवणआप्पा साळेगावकर म्हणाले आपल्या धर्माचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. धर्माची शिकवण आणि आचरण जपणं हे वीरशैव लिंगायत संप्रदायातील व्यक्ती महत्वाचे आहे. प्रत्येकाने समाजातील रुढी परंपरा प्रथा यावर चिंतन आणि मनन करून पुढच्या पिढीला आदर्शवत शिकवण देणं तुम्हां आम्हांची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रपंच नेटका करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं ते म्हणाले.
या कार्यक्रमासोबत श्री शंकरलिंग मंदिर देवस्थान सेलू व मातोश्री ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सत्तावीस रक्तदात्यांनी आपली रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून करण्यात आली. देवस्थानच्या वतीने उपस्थित व्यासपीठावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवनपसाळेगावकर प्रमुख अतिथी शिवलिंग आप्पा बोधने कार्यक्रमाचे व्याख्याते आशीष साडेगावकर , देवस्थानचे अध्यक्ष अशोकआप्पा वाडकर या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक देवस्थानचे सचिव प्रा.मिलिंद झमकडे, सुत्रसंचलन विरेश खडगे, आभार सुनील तोडकर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी ऍड ,शाम राऊत ,विश्वनाथ हुगे ,शुभम महाजन , पवन मिटकरी सुजित मिटकरी शुभम नवघरे, बाळ वीर, यश नावडे, सर्वेश नावाडे , अजय झमकडे, विजय झमकडे,उत्तरेश्वर साडेगावकर , मनमंन्थआप्पा साडेगावकर, गणेश नवघरे, पवनस्वामी कामटे, विनायकस्वामी कीर्तनकार इत्यादी..

Check Also

सेलूत शनिवारी ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा

सेलू ( प्रतिनिधी ) येथील स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले …