09/05/26
Breaking News

Shabdraj

येलदरी धरणातून कोणत्याही क्षणी सोडणार पाणी

परभणी,दि.11(प्रतिनिधी) : खडकपूर्णा प्रकल्पातून 2 गेटद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला असून त्यामुळे येलदरी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून येलदरीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. सोमवारी सकाळी या जलाशयात 89.74 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची आवक ओळखून पाटबंधारे खात्याद्वारे येथून पुढे केंव्हाही येलदरी येथील जलविद्युत केंद्रातील टर्माइनला व नदीपात्रातसुध्दा पाण्याचा विसर्ग केला जाईल, असे …

Read More »

आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट-मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत मोठ्या लाखोंच्या संख्येने जाणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. गोव्याला नुकताच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला, …

Read More »

डिजी प्रवेश पास असल्याशिवाय मंत्रालयात एंट्री नाही

: राजधानी मुंबई हे महाराष्ट्राचं मुख्यालय म्हणता येईल, विधिमंडळ, सचिवालय आणि मंत्रालय (Mantralay) ह्या महत्त्वाच्या आणि प्रशासकीय व प्रमुख संस्था मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात नागरिक, राजकीय नेतेमंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख भेटी देत असतात. स्थानिक आणि जिल्हा पातळीवर आपली कामे रखडल्यानंतर संबंधित व्यक्ती वा संस्था मंत्रालयाचं दार ठोठावत असते. मात्र, आता मंत्रालयाचं दार सहजपणे ठोठावता येणार नाही. मंत्रालयीन प्रवेशासाठी (Pass) सरकारने आता ऑनलाईन प्रवेश …

Read More »

स्वातंत्र्य दिनी कोणते मंत्री कोठे करणार ध्वजारोहण..यादी जाहीर

: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन …

Read More »

मोगरा कॉलनीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

परभणी,दि 11 ः परभणी शहरातील वार्ड क्रमांक १०, जुना पेडगाव रोड, रायगड कॉर्नर येथील मोगरा कॉलनीत  आयोजित पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यात शिवसेना उबाठा गटाचे रामेश्वर आवचार पाटील, शुभम कुमार तेवर, राजू अण्णा मुंजाभाऊ पांचाळ, पवन पारखे, रवी बंनचर, कृष्णा वाकडे, रवी …

Read More »

भरधाव कार कावड यात्रेत घुसली, दोन भाविकांचा मृत्यू, चार जखमी

सेलु/पाथरी,दि 11 (प्रतिनिधी) पाथरी-सेलू रस्त्यावरील खेडूळा पाटीजवळ भरधाव कार कावड यात्रेत घुसल्याने या भीषण अपघातात कावड यात्रेतील दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.११) पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. श्रावण सोमवार निमित्त सेलू येथून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे २५० कावड यात्रेकरू आले होते. मध्यरात्री रामपुरी येथे थांबून पहाटे कावड …

Read More »

मनोज जरांगे पाटील बुधवारी परभणी दौऱ्यावर

परभणी,दि 10ः संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील दिनांक 13 तारखेला वार बुधवार रोजी  सावली विश्राम गृह येथे  दिवसभर सकाळी 9 पासून परभणी जिल्ह्यातील आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते, मराठा बांधव, मराठा सेवक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर बांधव, वकील बांधव, सरपंच,उपसरपंच,जिल्हा परिषद सदस्य, सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी या सर्वांना सोबत गाठी भेटी घेणार आहेत व सर्व बांधवांसोबत चर्चा करणार आहेत तरी सर्व …

Read More »

विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व रक्षाबंधन साजरा

सेलू/प्रतिनिधी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन(९ऑगस्ट )व रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य सह शिक्षक विनोद मंडलिक यांनी स्वा.वि. दा. सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.ते पुढे म्हणाले की , स्वा. सावरकरांचे जीवन संघर्षमय होते ,अनेक क्रांतिकारकांना त्यांचे विचार प्रेरणादायी ठरले.भाषा समृद्धीसाठी त्यांनी प्रयत्न केले.मराठी ही थोर आणि प्राचीन भाषा आहे,जगाच्या …

Read More »

मराठे हिंदू नाहीयेत का? मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदू-मुस्लिम वादासंदर्भात भाष्य करताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठे हिंदू नाहीयेत का? जर जातचं संपली, तर मग धर्म कसा टिकवायचा? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ते अहिल्यानगरमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागले आहेत. आमचा …

Read More »

सेलूत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

सेलू ( प्रतिनिधी ) आज दि.९ ऑगस्ट शनीवार रोजी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुले नगर ( हमालवाडी) येथील विद्यार्थांना ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . संयोजक सुनील गायकवाड यांनी हात मदतीचा तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …

Read More »