परभणी,दि 01 ः राजु शेट्टी यांनी शक्तीपिठ महामार्गाच्या विरोधात १२ जिल्ह्यात पुकारलेल्या चक्का ज्याम आंदोलनात आज परभणी जिल्ह्यातील शक्ती पिठ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहे. पिंगळी या गावातील परभणी ते नांदेड जाणारा राज्य मार्ग शेतकऱ्यांनी उडवून धरला ज्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होते तिथूनच शक्ती पिठ महामार्ग जाणार आहे. तिथेच आंदोलनास सुरुवात झाली …
Read More »Shabdraj
वसंतराव नाईकानी देशाला दिशा देण्याचे काम केले : प्राचार्य डॉ. बबन पवार
परभणी : येथील शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक, कृषी तज्ञ वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख …
Read More »हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांना वनामकृवित अभिवादन
परभणी,दि 01 ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठातील स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या हस्ते पुष्पपूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षण संचालक …
Read More »गंगाखेड रोडवरील अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा,तातडीची बैठक व पाहणी
परभणी,दि 01 ः शहरातील जीवघेणा ठरत चाललेल्या गंगाखेड रोडवर झालेल्या दुर्दैवी बस अपघातात शेख समीर शेख मिया भाई व शेख मुशरान शेख मुस्तफा या दोन तरुणांनी आपला प्राण गमावला. २२ जून रोजी घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला, आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत, २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत तात्काळ …
Read More »भाजपा मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष..एकच आला अर्ज
भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज केंद्रीय निरीक्षक किरेन रिजुजी यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. 1 जुलै रोजी संध्याकाळी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा …
Read More »जमिनीचे हे कागदपत्रे असणे बंधनकारक, अन्यथा शासन घेणार…..
मुंबई : शेतकऱ्यांकडे त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रांचा अभाव असल्यास, कायद्यानुसार अशा जमिनीवर सरकार ताबा घेऊ शकते. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाकडून वेळोवेळी भूमापन आणि सर्वेक्षण केले जाते. त्यावेळी मालकीचे दस्तऐवज न सादर झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरील हक्क सिद्ध करण्यात अडचणी येऊ शकतात. कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? राज्य महसूल नियमावलीनुसार कोणतीही जमीन ‘रिक्त’ किंवा ‘अनधिकृत’ असल्याचे सिद्ध झाल्यास ती शासनाच्या मालकीची समजली …
Read More »प्रतिक्षा संपली…अकरावीच्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या 11 वी प्रवेशाची (XI admission) यादी दोन दिवसांआधीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे 11 वी प्रवेशाची पहिली यादी 30 जूनला जाहीर होणार होती, पण पहिली गुणवत्ता यादी आजच शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी (College) ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी …
Read More »विदयार्थी जर सुसंस्कारित असेल तर भविष्यात त्याला काहीच अडचण येणार नाही-सागर सुभेदार
सेलू ( नारायण पाटील ) येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दि २८/६/२५ रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी होते .तर प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ बडोदा शाखा विरार चे शाखाव्यवस्थापक तसेच याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर सुभेदार यांची उपस्थिती होती . संस्थेचे सचिव प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर …
Read More »डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे जी पॅट परीक्षेत यश
पाथरी / प्रतिनिधी – अखिल भारतीय स्तरावरील जी पॅट परीक्षेत डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत.कुमार.ज्ञानेश्वर नामदेव मगर व कुमारी.शारदा शिवाजी वाव्हळे यांनी चांगल्या गुणांनी परीक्षेत यश संपादित केले व महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यार्थ्याच्या यशासाठी परभणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुलजी पाटील , श्री. परिहार साहेब व रमेश पाटील सर,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले सर …
Read More »शेतकऱ्यांसाठी शून्य ऊर्जेवरील शीतकक्ष प्रात्यक्षिक
सेलूतील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम सेलू / प्रतिनिधी – येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी वालूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या दाखवले. हा नाविन्यपूर्ण शीतकक्ष भाजीपाला आणि फळांच्या योग्य साठवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. वालूर येथे पार पडलेल्या या प्रात्यक्षिकादरम्यान, कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना विटा, वाळू, बांबू आणि वाळलेल्या गवताचा वापर करून अत्यंत कमी खर्चात शीतकक्ष कसा …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com