राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी सक्तीचे केले असले, तरी ही प्रक्रिया महिलांसाठी मोठा त्रासदायक अनुभव ठरत आहे. दोन महिन्यांची मुदत देऊन शासन निर्णय जारी करण्यात आला असला, तरी लिंक ओपन न होणे, अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर येणे, ओटीपी न मिळणे या तांत्रिक अडचणींनी बहिणींना खूपच मनस्ताप होत आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारने …
Read More »Shabdraj
एसटी महामंडळात 17 हजार 450 पदांची भरती होणार…2 ऑक्टोबर पासून करा…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच 17 हजार 450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. येत्या काही काळात एसटी महामंडळ 8 हजार नवीन बस खरेदी करणार आहे. या बससाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळं ही भरती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात होणाऱ्या भरतीसाठी 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची अलीकडेच बैठक पार पडली. …
Read More »कब्बडी स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश
परभणी,दि 21 ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि योगानंद महाविद्यालय, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी (मुले) स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून यशाचा परंपरा कायम ठेवली आहे. सदरील स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला होता.श्री शिवाजी महाविद्यालयाने बहिर्जी महाविद्यालयाचा पराभव करून हा विजय मिळवला. या संघात कर्णधार आकाश कांबळे, ज्ञानेश्वर भुसारे, आत्मलिंग गलांडे, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करतील. ते काय बोलतील हे अधिकृतपणे निश्चित झालेले नाही, परंतु नवीन जीएसटी दरांच्या अंमलबजावणीवर ते बोलू शकतात अशी अटकळ आहे. याव्यतिरिक्त, ते आगामी सणांच्या हंगामासाठी स्वदेशी उत्पादनांच्या प्रचारासाठी आवाहन करू शकतात, हा मुद्दा त्यांनी मणिपूर, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भेटींमध्ये मांडला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी १२ मे रोजी रात्री ८ वाजता …
Read More »आज जवळा येथे माटेगावकर मित्र मंडळ करणार रास्ता रोकोे
हिंगोली,दि 20 (प्रतिनिधी)ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संदीप भैया माटेगावकर मित्र मंडळाच्या वतीने जवळा बाजार येथे रविवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग तीन महिने अतिवृष्टी झाली यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा आणि …
Read More »सलग बाराव्या वर्षीही सेलूच्या महिला नाट्यकलावंत ठरल्या पारितोषिकाच्या मानकरी
सेलू,दि 20 (प्रतिनिधी)ः दि १९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला राज्य नाट्य स्पर्धेत सेलूच्या नाट्य कलावंतांनी यावर्षी देखील पारितोषिक पटकावले आहे. सतत १२ वर्षापासुन या स्पर्धेत परितोषक पटकवण्याचा मान त्यांना मिळाला आहे यावेळी जयश्री सोन्नेकर लिखीत आणि दिग्दर्शीत ” पाहुणे आले हो ” हे नाटक अव्वल राहिले. अतिशय अल्पावधीत तयारी करत या नाटकाचे सादरीकरण …
Read More »सेलू येथे जिल्हास्तरीय अमृत मेळावा संपन्न
सेलू,दि 20 ः खुल्या प्रवर्गातील समाजघटकांना शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेतर्फे शुक्रवारी (ता. १९) सायं. ४.३० वा. श्री केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरात जिल्हास्तरीय भव्य अमृत मेळावा पार पडला. या मेळाव्याचा मुख्य उद्देश लक्षित गटातील नागरिकांना शैक्षणिक, कौशल्याधारित व रोजगाराच्या संधींचे मार्गदर्शन करणे हा होता.मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक अमृत संस्थेचे राज्य …
Read More »हिंगोलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने मारले आ. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे
हिंगोली,दि 20 राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शनिवारी (ता.20) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात जे अपशब्द वापरले होते त्याचा जाहीर निषेध करत पडळकर यांच्या पोस्टरला जोडे …
Read More »मोठी बातमी…राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा..एकला चलोरे…
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दोनच दिवसांपूर्वी दिलेले असताना सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिबिर नागपुरात संपन्न होत असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक …
Read More »निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शिक्षण परिषद उत्साहात
सेलू,दि 19 (प्रतिनिधी)ः येथील कन्या सेलू केंद्रातर्गत मासिक शिक्षण परिषद उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली.या वेळी व्यासपीठावर केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,साधन व्यक्ती योगेश ढवारे,मोजम शेख,दिपक कांडेकर, कालिदास शिनगारे,मीरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.अगदी खेळीमेळीच्या व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.या वेळी वेगवेगळ्या विषयावर सखोल चर्चा व माहिती देण्यात आली. निपुण परभणी या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमाबात योगेश ढवारे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com