25/06/26
Breaking News

शहरातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार

सेलू ( प्रतिनिधी )

येथील तालुका पेन्शनर्स असोसिएशन च्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सेलू तालुका पेशनर्स असोसिएशन च्या विसावा सभागृह दि ५/४/२६ रोजी करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ शरद कुलकर्णी ,सचिव नारायणराव इक्कर तसेच सत्कार मूर्ती डॉ एस एम लोया ,नंदकिशोर बाहेती ,निशिकांत पाटील ,महादेव अगजाळ ,प्रकाश धामनगावकर,बळवंतराव देशपांडे , कालिदासराव जोशी सावरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी कै .सखरामपंत मुळे,कै .जयसिंगराव पवार यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली .

संघटनेच्या विविध उपक्रमाचा कार्यअहवाल गौतम सूर्यवंशी यांनी सादर केला .तसेच संघटनेचे सचिव नारायणराव इक्कर यांनी जमाखर्चचा अहवाल सादर केला तसेच रवींद्र मुळावेकर यांनी वाढदिवसाच्या यादीचे वाचन केले .

यावेळी “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल डॉ एस एम लोया ,”महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा “उत्कृष्ठ निर्यात उद्योजक” पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल येथील प्रसिद्ध उद्योजक कोहिनुर रोप चे नंदकिशोर बाहेती, महिला वर्गासाठी विशेष कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रशासनाच्या महिला आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल शुभंकरोती फाऊंडेशन चे निशिकांत पाटील तर विविध संघटनेच्या वतीने “उत्कृष्ठ ग्रंथपाल” पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रंथपाल महादेव अगजाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
तसेच बळवंतराव देशपांडे ,प्रकाशराव जोशी धामनगावकर व कालिदासराव जोशी सावरगावकर, यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले .

यावेळी सत्कारमूर्ती डॉ एस एम लोया ,नंदकिशोर बाहेती व निशिकांत पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना संघटनेच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिला .तसेच आमच्या कार्याची दखल पेन्शनर्स असोसिएशन ने घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले . तसेच वाढीदिवस अभिष्टचिंतन केल्याबद्दल कालिदासराव जोशी यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले .
अध्यक्षीय समारोपात डॉ शरद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की ,पेन्शन भुवन विविध दर्जेदार कार्यक्रम घेण्याचा संकल्प केलेला आहे .तसेच संघटनेच्या वतीने सदस्याचे वाढदिवस साजरे करून आनंद साजरा केला जातो . यावेळी त्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे अभिनंदन केले . व त्यांचा सन्मान करता आला हे आमचे भाग्य समजतो असेही त्यांनी यावेळी सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .ए .टी .कुलकर्णी यांनी केले तर सुनील कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …