24/06/26
Breaking News

सहकारातील रणशिंग फुंकले! आ. डॉ. रत्नाकर गुट्टेंचा थेट प्रवेश

 रामप्रसाद ओझा / गंगाखेड
परभणी–हिंगोली जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०२६-२०३१ गंगाखेडचे डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी थेट रणांगणात उडी घेतली आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, गंगाखेड मतदारसंघातून संचालक पदासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकारी सुरेश पी. काकडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी बी. एस. नांदापुरकर यांच्याकडे दाखल केला.
या घडामोडीमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, गंगाखेडसह संपूर्ण परभणी–हिंगोली जिल्ह्यात राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. अर्ज दाखल करताना सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
चौकट :
आ. गुट्टे यांच्या उमेदवारीमुळे सहकार क्षेत्रातील जुन्या दिग्गजांसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. आ. गुट्टेंना राजेश विटेकर, राजू नवघरे, संतोष बांगर, माजी आ. तानाजी मुटकुळे तसेच राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांची भक्कम साथ लाभली तर , येत्या काळात सहकार क्षेत्रात अभूतपूर्व हालचाली आणि राजकीय वातावरणात मोठ्या उलथापालथी घडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …