25/06/26
Breaking News

यशामागे असलेल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा -नगराध्यक्ष मिलिंद सावंत

सेलू ( प्रतिनिधी )
जीवनात आपण कितीही यश मिळवले तरी त्यामागे आपल्या आई वडिलांचे कष्ट असतात याची जाणीव ठेवा असे आवाहन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना केले .

येथील छत्रपती शाहूमहाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गटकळ करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,केंद्र सेलू यांचा महाराष्ट्र पोलीस भरतीत यावर्षी ऐतिहासिक निकाल लागला आहे .
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीत निवड झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांची आज दि २३ मे रोजी शहरातून  मिरवणूक काढण्यात आली .व महेशनगर मधील साई नाट्यगृहात त्या विद्यार्थ्यांचा  सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन संस्थेचे सचिव प्रा . डॉ . विनायकराव कोठेकर होते .तर प्रमुख अतिथी म्हणून सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची उपस्थिती होती . गटकळ अकेडमी चे संचालक रामेश्वर गटकळ ,दत्तात्रय गटकळ
,दीपस्तंभ प्रतिष्ठान सेलूचे अध्यक्ष माधव लोकूलवार,भा ज प चे तालुकाध्यक्ष गणेश काटकर ,जेष्ठ पत्रकार राम सोनवणे,नारायण पाटील ,रामराव गायकवाड , रामराव बोबडे , परमेश्वर लाटे यांची उपस्थिती होती.नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत यश संपादन केलेल्या खाकी वर्दीतील एकूण २१ विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्या सह मान्यवरांच्या हस्ते शाल ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …