16/10/26
Breaking News

हिंगोलीत भाजपाची जिल्हा आढावा बैठक संपन्न

हिंगोली (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीची रविवारी हिंगोली शहरातील हॉटेल रामकृष्ण येथे कार्यकर्ता संमेलन आणि जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली बैठकीत सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या बैठकीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी संजयभाऊ कौडगे उपस्थित होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आगामी काळातील राजकीय रणनीती, पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनात्मक बळकटीकरणाबाबत अत्यंत मोलाचे व दिशादर्शक मार्गदर्शन केले.तसेच आगामी काळातील मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील भाजपच्या सद्यस्थितीचा आणि सुरू असलेल्या संघटनात्मक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या संमेलनाला राज्यसभा खासदार डॉ.रामराव वडकुते,आमदार तान्हाजीराव मुटकुळे,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर ,जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे,अतिश दांडेगावकर,महीला मोर्चाचे उज्वलाताई तांभाळे ,युवा जिल्हाअध्यक्ष शिवाजी मुटकुळे,शशिकांत वडकुते जिल्हा प्रवक्ता विलास गोरे यांच्यासह डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती संमेलनाचे संयोजक सुरजीत सिंह ठाकुर, समिती सदस्य शंकर बोरुडे, सुभाष लदनीया यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
या बैठकीसाठी रजनिश पुरोहीत, माणिक लोडे,कांतराव कोटकर, विष्णु बोचकरी विठ्ठल भोयर,औंकार नावडे, सुधाकर लोमटे ,पवन उपाध्याय,श्रींरग राठोड ,पद्माकर नायक ,हनुमान कराळे ,गुड्डु देवकते, संदीप वाकडे,तसेच भाजपचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …