सेलू ( प्रतिनिधी )
तालुक्यातील कुंडी परिसरात एका जुन्या रस्त्यावर शहरातील रहेमान नगर मधील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार ६ नोवेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रात्री साडेआठच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद सेलु पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील रहमान नगर मध्ये राहत असलेल्या समीर वहाब शेख वय २४ वर्षे या तरुणाचा मृतदेह पाथरी रस्त्यावर कुंडी परिसरात आढळून आला. घटनेची माहिती पोलीसांना कळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर,पोलीस शिपाई सोपान बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची ओळख पटल्यामुळे पोलीसांनी शवविच्छेसाठी मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. देऊळगाव गात येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोया यांनी शवविछेदन केल्यानंतर केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले. मताचा भाऊ गणी वहाब शेख राहणार रहेमान नगर यांनी दिलेल्या खबरे वरून कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट पुढील तपास करत आहेत.या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीसांचा तपास आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
Shabdraj www.shabdraj.com