24/06/26
Breaking News

सीए अनूप शुक्ला यांची महाराष्ट्र चेंबरच्या परभणी जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवड

गंगाखेड / प्रतिनिधी – परभणी येथील रहिवासी सीए अनूप शुक्ला यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर, मुंबईच्या परभणी जिल्हा गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांची ही निवड जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

सीए अनूप शुक्ला यांची निवड त्यांच्या व्यावसायिक अनुभव, आर्थिक क्षेत्रातील जाण, कार्यकुशलता आणि उद्योग-व्यापार क्षेत्रातील योगदानाची दखल म्हणून पाहिली जात आहे. आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी व्यापारी, उद्योजक आणि विविध संस्थांना दिलेले मार्गदर्शन यामुळे त्यांनी परभणी जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण केली आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि कृषी आधारित व्यवसायांच्या विकासासाठी काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वातून स्थानिक उद्योगांना चालना, व्यापार सुलभीकरण आणि उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यापारी वर्ग व उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

सीए अनूप शुक्ला यांच्या निवडीबद्दल सारस्वत समाजासह व्यापारी, उद्योजक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध सामाजिक संस्थांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या कार्यकाळात परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक व व्यावसायिक विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …