24/06/26
Breaking News

 हिंगोलीत सईद खान यांच्या विजयाचा जल्लोष; गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी!

हिंगोली,दि 22 ः
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सईद खान यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या दणदणीत विजयाची घोषणा होताच हिंगोली जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हिंगोली शहरातील ऐतिहासिक आणि मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गांधी चौक येथे महायुतीच्या वतीने भव्य जल्लोष करण्यात आला.

शिवाजी मुटकुळे (अध्यक्ष, भाजप जिल्हा युवा मोर्चा),श्रीराम  बांगर (शिवसेना गटनेते, हिंगोली नगरपालिका),शेख निहाल (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी)
या प्रमुख नेत्यांसह हिंगोली नगरपालिकेचे महायुतीचे सर्व आजी-माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते या ऐतिहासिक जल्लोषात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …