17/10/26
Breaking News

निरोगी व संतुलित जीवनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग – सत्येंद्र चौधरी

सेलू ( प्रतिनिधी )
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन (२१जून ) उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ही भारतमाता प्रतिमा पूजनाने झाली.शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी,अर्थ समितीचे अध्यक्ष सत्येंद्र चौधरी, अनिल कौसडीकर, विनोद मंडलिक यांची उपस्थिती होती.
योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते, तणाव कमी होण्यास मदत होते तसेच निरोगी शरीर व प्रसन्न मन होण्यासाठी योग महत्वाचा आहे असे मत सत्येंद्र चौधरी यांनी व्यक्त केले.गजानन साळवे यांनी प्राणायाम, योग यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले तर काशिनाथ पांचाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …