सेलू (प्रतिनिधी)
“सेलू सारख्या अतिशय छोट्याशा शहरात साने गुरुजी कथा मालेचे रोपटे केवळ दुर्गा ताईंनी लावलेच नाही तर ते फुलवले, रुजवले. आणि सेलूच्या घराघरात श्याम निर्माण करण्याचे कार्य कै. दुर्गाताई कुलकर्णी यांनी केले. म्हणून सेलूच्या श्यामच्या आई म्हणजेच दुर्गाताई “.असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर यांनी केले.
श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला येथे स्व. सौ दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रंथालयात( 31 जुलै )आ. दुर्गाताई कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण करताना प्राचार्य विनायकराव कोठेकर सर बोलत होते.
व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर,नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य प्राचार्य शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बिराजदार,प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दतराव घोगरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची उपस्थिती होती. दुर्गाताई कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रशालेतील हर्षदा मोगल हिने आई विषयक संस्कार कथा सादर केली. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन सौ. कीर्ती राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री भालचंद्र गांजापुरकर यांनी केले.
Shabdraj www.shabdraj.com