सेलू /प्रतिनिधी कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य,नियोजित अभ्यास व योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्कीच आपल्याला मिळते असे मत करुणा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. बी.डी. एस. (ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप ) व N. M. M. S. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) …
Read More »मराठवाडा
सेलू शहरात स्मार्ट मीटरच्या सक्ती वरून नागरिकांमध्ये संताप
सेलू (प्रतिनिधी) सेलू शहरात वीज ग्राहकांच्या घरांमध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीमार्फत नवीन स्मार्ट/डिजिटल मीटर बसविण्याचे काम सुरू असून हे मीटर नागरिकांच्या संमतीशिवाय बळजबरीने बसविले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकाराविरोधात नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन ही कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक …
Read More »महिला दिनानिमित्त नगरपरिषद च्या वतीने महिला मेळावा संपन्न
बचत गटास सन्मानचिन्ह देऊन गौरव पुर्णा / सुशील दळवी – पुर्णा नगर परिषद, पूर्णा दीनदयाळ जनअजिविका अभियान (DJAY) स्वाभिमान शहर स्तर संघ संचलित सोनचिरैया शहर उपजिवीका केंद्र, पुर्णा यांच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तसेच याचे मेळाव्याच्या सुरुवातीस स्वाभिमान शहर स्तर संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती …
Read More »जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र महाभारत देते- स्वामी गोविंददेव गिरीजी
महाभारत संदेश कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू / प्रतिनिधी – चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण, चार साधना याचे सर्व ज्ञान असलेला एकमेव महाभारत हा ग्रंथ आहे. नित्य महाभारत श्रवणाने बुध्दी तिक्ष्ण होते. यशस्वी होण्याचा मुलमंत्र महाभारत कथा देते. असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत गुरूवार ( दि.१२ ) रोजी …
Read More »सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज
सेलू( प्रतिनिधी) शहरात १२ मार्च ते १९ मार्च कालावधीत संपन्न होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी नगरी सज्ज झाली आहे. ११ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. अलंकापुरी पारायण, कथा स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम १२ मार्च ते १९ मार्च या कालावधीत अलंकापुरी नगरी, …
Read More »महिला दिनानिमित सेलूत वेशभुषा स्पर्धा व महिलांचा सन्मान सोहळा संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी नगर हनुमान मंदीर परिसरात शालेय विद्यार्थीनी साठी वेशभुषा स्पर्धेचे व ५१कर्तत्वान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला शहरातील कै . डॉ . अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , आस्था सेवाभावी संस्था अधिराज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सामाजिक कार्यकर्ता सुनील गुलाबराव गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्दयमाने आयोजीत सन्मान नारिशक्तीचा व मुलींनसाठी …
Read More »गंगाखेड शहर घाणीच्या विळख्यात; नगरसेविका कविता राठोड आक्रमक
प्रतिनिधी | गंगाखेड गंगाखेड शहरात सध्या घाणीचं अक्षरशः साम्राज्य माजलं असून, स्वच्छतेची अवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नगर परिषद प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा थेट आरोप यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका कविता संदीप राठोड यांनी केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सोमवार …
Read More »संकल्प संस्थेकडून जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पाथरी (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. “शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी पाऊल उचलणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव” या विषयावर आयोजित या कार्यक्रमात ऊसतोड कामगार माता, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच हंगामी वस्तीगृहातील स्वयंपाकी महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला …
Read More »बाभळगाव येथे लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक आजाराचे लसिकरण शिबीर
पाथरी,दि 09 ः पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे शनिवारी (दि.सात) पशुसंवर्धन विभागांमार्फत लाळ खुरकूत या प्रतिबंधात्मक आजाराच्या लसीकरणाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य अण्णासाहेब रणेर यांच्या हस्ते झाले यावेळी पाथरी पंचायत समिती सदस्य श्रीधर किसनराव गिराम,सरपंच माणिकराव रणेर, पाथरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ बागेस बसेट, वाघाळा पशुधन केंद्राचे प्रमुख डॉ के. एन. जाधव, …
Read More »पूर्णा येथे मंगळवारी महिला बचत गटांचा सन्मान सोहळा
सुशिल दळवी पूर्ण,दि 09 ः पूर्णा नगर परिषद, दीनदयाल उप जीविका अभियान (DJAY) आणि स्वाभिमान शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला मेळावा’ व महिला बचत गटांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असून शहरातील महिला बचत गटांनी व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १० …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com