05/02/26
Breaking News

मराठवाडा

सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे विचार व कार्य मानवतावादी होते : प्राचार्य डॉ. बबन पवार

परभणी,दि 26ः येथील शारदा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बबन पवार म्हणाले की महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी चक्रधर यांनी जगा आणि जगू द्या असा अहिंसावादी विचार जगाला दिला. …

Read More »

परभणीत वंदे भारत एक्सप्रेसचे भाजपा महानगर कडून जल्लोषात स्वागत

परभणी ,दि 26 दक्षिण मध्य रेल्वेचा ऐतिहासिक क्षण आज मराठवाड्याने अनुभवला. हुजूर साहेब नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते (ऑनलाईन) हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रसंगी परभणी स्थानकावर गाडीचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. स्थानक परिसरात ढोल-ताशांचा …

Read More »

मोरेगावात वानरांचा उच्छाद; ग्रामस्थ हैराण

सेलू,दि 25 ः सेलू तालुक्यातील मोरेगावात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातील धान्याची नासधूस, गोरगरिबांच्या घरावरील पत्र्यांचे नुकसान, घराच्या छतावरील सौर प्लेट फोडणे, विजेच्या तारा तोडणे, लहान लेकराच्या हातातील वस्तू हिसकावणे, घरात उतरून भाकरी पळवणे, त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येतात अनेकांची पत्रे पाडली आहेत.त्यामुळे घराच्या बाहेर निघताना भिती …

Read More »

सेलूतील जैन समाजाच्या आंतर-शालेय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सेलू,दि 25 (प्रतिनिधी) ः भगवान महावीर जन्म कल्याणकाच्या पवित्र प्रसंगी श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर,सेलू संस्थे द्वारा आयोजित आंतर-शालेय निबंध स्पर्धेत १० शाळांतील एकूण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पडला. स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ व विशेष लेखनासाठी विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम पुरस्कार म्हणून ३० ग्रॅम चांदीचे नाणे,द्वितीय पुरस्कार …

Read More »

विजयसिंह पंडित यांनी काढली थेट लक्ष्मण हाकेंची लायकी

ओबीसी नेते लक्ष्मण हाके नेहमी चर्चेत असतात. अशातच आता बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात संघर्ष पेटला आहे. बीडमध्ये दाखल झाल्यानंतर विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला केला. जोरदार घोषणाबाजी करत हाकेंच्या ताफ्यावर समर्थक धावून गेले. पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवलं. या घडलेल्या प्रकारनंतर विजयसिंह पंडित यांनी थेट लक्ष्मण हाकेंची …

Read More »

भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी -प्रा.डॉ.सचिन खडके

परभणी,दि 24 ः भौतिकशास्त्र विषयाची व्याप्ती ब्रम्हांडापासून ते अतिसूक्ष्म अणु-रेणूपर्यंत आहे. अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे. मुळात हे क्षेत्र भौतिकशास्त्र आणि गणित विषयाशी निगडित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रातल्या विविध संधी ओळखून या विषयात पारंगत होऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन शारदा महाविद्यालयाचे मराठीचे प्रा. डॉ. सचिन खडके यांनी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र अभ्यास …

Read More »

पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवावर आधारित शिक्षण आवश्यक-पद्मश्री डॉ.अभय बंग

सेलू,दि 23 (प्रतिनिधी) ः सध्याची शिक्षण पद्धती ही शिक्षण तर देत आहे पण शिकलेले सगळेच नौकरी किंवा इतर क्षेत्रात पुढे येत नाहीत.शिक्षण घेऊन साक्षर असलेले असंख्य आहेत पण बेरोजगारांची संख्याही तेवढीच वाढत आहे.यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवावर आधारित शिक्षण देणे आवश्यक असून अनुभवातून शिक्षण दिल्यास आपल्याला जीवनात काय करायचे आहे ते लक्षात येईल व बेरीजगारांची संख्या कमी होईल असे मत …

Read More »

डॉ.रामकिशन भिसे यांची प्रतिष्ठित IATEFL रे टंग स्कॉलरशिपसाठी निवड

परभणी,दि 22 ः मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील रहिवासी असलेले सध्या नवी मुंबईतील नेरुळ येथील SIES ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी येथील कम्युनिकेशन स्किल्सचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रामकिशन बाबुराव भिसे यांना इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ इंग्लिश अ‍ॅज अ फॉरेन लँग्वेज (IATEFL), यूके कडून रे टंग स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. IATEFL चे संस्थापक कोषाध्यक्ष रे टंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेली …

Read More »

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

परभणी, दि. 22 ( : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 9 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक- 2025-26 करीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी परिशिष्ट 8 (अ) व 8(ब) मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, …

Read More »

आज सेलूत “ज्ञानेशवरी प्रवचन सेवा व सामूहिक ज्ञानेश्वरी ” पारायण सांगता

सेलू,दि 22 ( प्रतिनिधी ) हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिण्याचे औचित्य साधून येथील ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये चालू असल्येल्या या अभिनव उपक्रमाची उद्या सांगता होणार आहे . दि २५ जुलै ते २३ औगस्ट या कालावधीत दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ज्ञानेश्वरी प्रवचन …

Read More »