24/03/26
Breaking News

मराठवाडा

सेलूत “नितीन चषक” क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

४ जानेवारी रोजी खेळपट्टीचे उदघाटन सेलू / प्रतिनिधी – येथील नितीन कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त निमत्रितांच्या राज्यस्तरीय “नितीन लहाने स्मृती चषक ” क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत नियोजनाबाबत बैठक आज माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.   या स्पर्धा दि …

Read More »

वानराच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात १६ वर्षीय तरुणी गंभीर जखमी

सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील लक्कडकोट परिसरात एका १६ वर्षीत तरुणीवर वानराच्या टोळीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणीवर सेलू उपजिल्हा रुग्णालयातून परभणी व पुढे नांदेड येथे उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतांना ओढावलेल्या या संकटामुळे हे संपूर्ण कुटुंबीय अडचणीत सापडले आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील लक्कडकोट परिसरात शुक्रवार २७ डिसेंबर रोजी …

Read More »

वाचन संस्कार रुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा-उदय जाधव

सेलू(प्रतिनिधी) ‘वाचन संस्कार रुजविण्यासाठी सामाजिक संस्था, राजकीय मंडळींनी सार्वजनिक वाचनालयात विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच अर्थिक अडचणीचा अडसर दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात यावेत, यासाठी पुढाकार घेण्यात यावा.’ असे प्रतिपादन गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयास दि २६ डिसेंबर शुक्रवार रोनी उदय जाधव यांनी भेट दिली. यावेळी या ग्रंथालयातील धार्मिक …

Read More »

श्री संत जनाबाई महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात दुहेरी धमाका

गंगाखेड (प्रतिनिधी): श्री संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या उज्ज्वल क्रीडा परंपरेला नवा मान मिळवून दिला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन सेंट्रल झोन हॉकी स्पर्धेत महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या मुलांच्या हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. संघाचे कर्णधार सुधीर कळसकर, …

Read More »

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सेलूत पत्रक वाटून जनजागृती

सेलू,दि 28 ः राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिंडी पंधरवाडा उपक्रमात आज दि २७ डिसेंबर रोजी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली . शहरतील सातोना रोड वरिल मॉर्निंग वॉक ग्रुप व केशवराज बाबासाहेब विद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ अंतर्गत आपणास मिळालेले अधिकार याबाबत चे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.यायाप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य व के.बा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी …

Read More »

निराधार महिलेस शेळी–करडू देत एचएआरसीची सामाजिक बांधिलकी

जिंतूर, ता. 27 : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा महिलेस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्यात आले. यासोबतच संबंधित कुटुंबास संसारोपयोगी भांडे साहित्य, जीवनावश्यक किराणा तसेच तीन अनाथ बालिकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. पार्श्वभूमी पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट …

Read More »

नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन

नांदेड : जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तर, या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस (Police) प्रशासनही चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी …

Read More »

मोहंमद रफी यांच्या जयंती निमित्त सेलूत संगीत मैफिल ” शाम ए सरगम” तर्फे संगीतमय मानाचा मुजरा

सेलू ( प्रतिनिधी ) प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांच्या १०१ व्या जयंती निमित्त येथील सेवानिवृत्त संघ सेलू यांच्या वतीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते . दि २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सेवानिवृत्त संघाच्या पेन्शन भवन मधील विसावा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून येथील उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक …

Read More »

साने गुरुजींचा जीवन प्रवास म्हणजे “श्यामची आई” – मंजुषा बोराडे

सेलू / प्रतिनिधी – “श्यामची आई ” पुस्तक म्हणजे साने गुरुजींचा जीवन प्रवास असून मराठी साहित्यातील मैलाचा दगड असल्याचे विचार सहशिक्षिका मंजुषा बोराडे यांनी एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले . स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने साने गुरुजी यांच्या जयंती निमिताने आयोजित” एक दिवस एक पुस्तक” या उपक्रमात साने गुरुजी लिखित ” श्यामची आई ” या पुस्तकाच्या चर्चा कार्यक्रमाचे …

Read More »

सेलूत माधवाश्रम स्वामी महाराजांचा ७६ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू

सेलू / प्रतिनिधी – शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात दि २४ डिसेंबर पासून परम पूज्य माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या ७६ व्या पुण्यतिथी सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे . आज सकाळी प पू माधवाश्रम स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच स्थापीत देवतेचे व कलश पूजन मंदिर चे पुजारी केशवराव मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बालासाहेब खापरखुंटीकर ,सुधीर मंडलिक यांनी …

Read More »