गंगाखेड,दि 16 (प्रतिनिधी)- पूर्वजांच्या स्मृतिदिनानिमित्त केवळ धार्मिक विधी न करता समाजोपयोगी, मानवी सेवेतून तो साजरा करणे ही खरी श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे यांनी केले. गरजू रुग्णांची हृदयरोग तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत एन्जिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे ही समाजासाठी मोठी आणि प्रेरणादायी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक १४ डिसेंबर …
Read More »मराठवाडा
श्री कालिकादेवीचा २८ वा वार्षिकोत्सव उत्साहात
सेलू : सेलू येथील विद्यानगर भागातील श्री कालिका देवी मंदिर संस्थानचा २८ वा वार्षिकोत्सव मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्री कालिका देवी सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात धार्मिक विधींसोबतच सामाजिक उपक्रमांवरही भर देण्यात आला होता. उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता देवीच्या अभिषेक महापूजेने झाली. दुपारी आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री कालिका देवी …
Read More »तलाठी व मंडळाधिकारी संपावर कामकाज ठप्प..
पुर्णा (सुशीलकुमार दळवी) तालुक्यातील महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाचे असलेले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी आज पासून सोमवार दि.15. संपावर गेले आहेत. नागरिकांना तातडीने ऑनलाइन सुविधा मिळण्यासाठी लॅपटॉप आणि इतर संबंधित साधनसामग्री तातडीने पुरवठा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. (डीएसएससी) प्रशासनाकडे जमा करून संप पुकारला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व कामकाज …
Read More »संत जनाबाई मंदिर विकास आराखड्याची मंजुरी अंतिम टप्प्यात
आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लेखी उत्तर गंगाखेड / प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये नगर विकास विभागाकडे लक्षवेधी सूचना क्रमांक ५७२ मांडली होती. त्यात गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सादर केलेल्या आराखड्याच्या मंजुरीबाबत विचारणा करण्यात आली होती. …
Read More »जीवघेणा ठरत असलेल्या मांजाची सेलूत कसून तपासणी सुरू
पोलीस प्रशासनाची शहरात झडती मोहीम सेलू / प्रतिनिधी – सध्या सर्वत्र पतंग उडविण्याचा हंगाम जोरात चालू असतानाच नायलॉन मांजाचा वाढता धोका लक्षात घेता .शहरात पोलीस प्रशासनाकडून मांजा विक्रेत्यांवर कार्यवाहीचा फास आवळणे सुरू केले असून शहरात नायलॉन गांजाच्या अनुषंगाने दुकानांची झडती मोहीम सुरू केले आहे . पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बलभीम राऊत ,हेड कॉन्स्टेबल तेलंग व …
Read More »मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 22 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
सेलू / प्रतिनिधी – माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या “हार-तुरे-शाल, पोस्टरबाजी किंवा अन्य अनावश्यक खर्च न करता जनहितासाठी योगदान द्या” या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानुसार जिंतूर सेलू मतदारसंघातील सर्व बोर्डीकर प्रेमी तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जमा झालेली झालेले रक्कम *22 लाख रूपयाचा धनादेश आज नागपूर येथे मा .राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या …
Read More »घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा
सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील बऱ्याच घरकुल धारकांचे थकित हप्ते तात्काळ जमा करावे नसता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा व्यंकटेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आला आहे . तालुक्यातील पीएम आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना या योजनांचे हप्ते मागील अनेक महिन्यापासून जमा झालेले नाहीत या आवास योजनांचे लाभ घेणारे लोक हे वंचित व गरीब परिस्थितीचे …
Read More »टाटा टेक्नॉलॉजीचे सीआयआयआयटी (CIIIT) केंद्र परभणीत
परभणी, दि.८ – परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (Center for Invention, Innovation, Incubation and Training )(CIIIT) प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून, या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगाशी सुसंगत अत्याधुनिक तांत्रिक व उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली …
Read More »स्वराज्य ट्रेकर्सची साल्हेर-मुल्हेर-मोरा-हरगड गिर्यारोहण मोहीम यशस्वी
परभणी,दि.04(प्रतिनिधी) : स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील सर्वात उंच किल्ला साल्हेर तसेच सालोटा, मुल्हेर, मोरा, मानगड व हरगड या खडतर गडांची गिर्यारोहण मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मोहिमेत परभणीतील उत्साही गिर्यारोहक सहभागी झाले. ही मोहीम साहाय्यक निबंधक माधव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व गुलाब गरुड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शनिवारी पहाटे साल्हेर किल्ल्याची चढाई सुरू झाली. दुपारपर्यंत हा …
Read More »सेलूतील व्यंकुशाह यात्रा महोत्सव,श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता
सेलू ( नारायण पाटील ) शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलू शहराचे ग्रामदैवत संत श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सव निमित्ताने आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी, ३ डिसेंबर रोजी महाप्रसादाने झाली. या वेळी शेकडो भाविकांनी श्री दर्शन, महाप्रसादासाठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त २७ नोव्हेंबरपासून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com