04/02/26
Breaking News

मराठवाडा

परभणी जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चीत,वाचा सविस्तर

परभणी, दि. 13 परभणी जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 अन्वये आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 54 निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण …

Read More »

 वरद लांडगेची चमकदार कामगिरी; विभागीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी येथील न्यू हायस्कूल शाळेचा विद्यार्थी चिरंजीव वरद श्रीराम लांडगे (इयत्ता आठवी) याने विभागीय जलतरण स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. फक्त पहिल्याच प्रयत्नात विभागीय विजेतेपद मिळवून वरदने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून हा परळी तालुका व न्यू हायस्कूल शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून आगामी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये तो आता बीड जिल्ह्याचे …

Read More »

जिल्हा परिषदेच्या राजपत्रित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे वेतन

परभणी : – दि. १३ ऑक्टोबर परभणी जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अतिवृष्टी व पुरामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या दोन दिवसांच्या वेतनाचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे. परभणी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संवर्गात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी यांचा …

Read More »

कुणाच्या चेहऱ्यावर हसू तर कोणाच्या कपाळावर आठ्या:झेडपी आरक्षण

कैलास चव्हाण परभणी/हिंगोली दि 13 ः कुणाच्या चेहऱ्यावर हसू तर कोणाच्या कपाळावर आठ्या तर कोणी स्तब्ध अशा अनेक भावमुद्रा जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यातील पुढार्‍यांच्या पाहायला मिळाल्या. काही खुशी कही गमचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. निमित्त होते जिल्हा परिषदेच्या गटनिहाय आरक्षण सोडतीचे आजच्या सोडतीने परभणी हिंगोली  जिल्ह्यातील अनेक मातब्बर आणि प्रस्थापीतांना मोठे धक्के मिळाले आहेत त्यामुळे आता निवडणुकीचा उडू द्या …

Read More »

मानसिक आरोग्यात व्यक्तीसोबत समाज, देश व जग बदलण्याची ताकत – डॉ. गोविंद यादव

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करताना जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीचे मनोविकारतज्ञ डॉ. गोविंद यादव म्हणाले की, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण मानसिक आरोग्यात व्यक्तीसोबत समाज, देश व जग बदलण्याची ताकत आहे. मानसिक आजार, मानसिक विकृतीचे परिणाम व्यक्ती, कुटुंबासह सर्व समजाला भोगावे लागतात. असंख्य व्यक्तींना मानसिक आजाराची ओळख नसल्याने मानसोपचार घ्यायला तयार होत …

Read More »

विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदील

सेलू / प्रतिनिधी – शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशाकंदील तयार केले.दीपावली सणानिमित्त कार्यानुभव विषयाअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी,नवनिर्मिती क्षमता विकसित होण्यासाठी स्वनिर्मित आकाशकंदील तयार करण्याचा उपक्रम सौ.रागिणी जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या कलाकृतीचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी,कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक …

Read More »

दिव्यांगाचा आत्मसन्मान वाढवणारे मोदीजी सारखे संवेदनशील नेत्रत्व देशाला मिळाले-पालकमंत्री ना.मेघनादीदी बोर्डीकर

सेलू / प्रतिनिधी – पूर्वी असलेला अपंग शब्द वगळून त्यांना दिव्यांग संबोधून त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचे व त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम देशातील संवेदनशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे .असे प्रतिपादन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू येथील कार्यक्रमात बोलतांना स्पष्ट केले .   परभणी जी प चे माजी सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Read More »

धाकधुक..जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदांची 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

परभणी, दि. 10- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्याकरीता सोमवार, …

Read More »

झरी शिवारात आखाड्यावर चोरट्यांचा धुमाकूळ

परभणी,दि.11(प्रतिनिधी) : तालुक्यातील झरी या गावाजवळ अज्ञात चोरट्यांनी शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून एका आखाड्यावरुन महिलांच्या अंगावरील दागदागिणे लंपास केले. तसेच मोटारसायकलही पळवली. जिंतूर ते झरी या रस्त्यालगत अनिल वटारे यांचे गट नंबर 1014 या क्षेत्रातील शेतात आखाडा आहे. गुरुवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास तीघा चोरट्यांनी आखाड्यावर येऊन गड्यास मारहाण केली. महिलांना शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून 4 ग्रॅम सोन्याची पोत,3 ग्रॅम …

Read More »

परभणीत शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

परभणी,दि 10 (प्रतिनिधी)ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील रोकडा हनुमान मंदीर, नवा मोंढा मैदानावर शनिवारी(दि. ११)आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सनदी लेखापाल व उद्याेजक प्रमोद नरहरराव जाधव तर प्रमुख …

Read More »