पूर्णा,दि 04 ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे मागील ६ वर्षांपासून श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये ५०० पेक्षा जास्त पदवीधारक विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महाविद्यालयात ५ व्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजनाने व विद्यापीठ गीताने करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील ७३ पेक्षा जास्त विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी …
Read More »मराठवाडा
लॉयन्स क्लबच्या वतीने 115 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी
सेलू / प्रतिनिधी – येथील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीरात आज ११५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी टप्याटप्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली. येथील चिरायू रुग्णालयात रविवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. नेत्र …
Read More »विद्या प्रसारणी सभा संस्थेतील विद्यार्थ्यांचे एमटीएस ओलंपियाड परीक्षेत घवघवीत यश
पूर्णा,दि 03 ः शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था विद्या प्रसारणी सभेची प्राथमिक तसेच हायस्कूल शाळा पूर्णा येथील विद्यार्थ्यांनी गतवर्षी झालेल्या एमटीएस ओलंपियाड ( महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन )परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधून त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी,भविष्यात अशाच परीक्षेमधून हे चिमुकले बालक उद्याचे भारताचे उत्तम नागरिक तयार व्हावेत. आदर्श व्यक्तिमत्व तयार व्हावेत त्यातून उज्वल …
Read More »उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गणेश गोरे सन्मानित
पूर्णा (प्रतिनिधी) – महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पूर्णा येथील ग्राम महसूल अधिकारी गणेश गोरे यांना महसूल दिनाच्या निमित्ताने दि.०१ ऑगस्ट रोजी गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री मा.मेघनादीदी साखोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, प्रांताधिकारी धैर्यशील जाधव, …
Read More »लोकनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर
पाथरी,दि 03 (प्रतिनिधी)ः जिल्ह्यातील मातब्बर लोकनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांची चर्चा झाली असून येत्या सात तारखेला प्रवेश होईल असे कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने त्यांची जागा भरून काढण्यासाठी बाबाजानी यांचा हा संभाव्य काँग्रेस प्रवेश असल्याचे मानले जात आहे.कार्यकर्त्यांनी देखील तसा आग्रह धरल्याने …
Read More »जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
सेलू,दि 02 ः महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती यांच्या मान्यतेने योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी आणि नूतन योग सेंटर सेलू आयोजित जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी नूतन योग सेंटर सेलू येथे यशस्वी संपन्न झाली. दिनांक 30 जुलै आणि 31 जुलै रोजी या स्पर्धा पुढील वयोगटात मुला मुलींची घेण्यात आली. सब ज्युनियर गट, जुनियर गट, …
Read More »इंदिरानगर भागात विज पुरवठा वारंवार खंडित,नागरीकांची तक्रार
रमेश बिजुले पाथरी,दि 02 ः पाथरी शहराच्या इंदिरानगर आणि परिसरातील विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.विजेचा लपंडाव नेहमीचीच समस्या झाल्यामुळे इंदिरानगर येथील नागरिकांनी पाथरी महावितरण कार्यालय गाठत या समस्येपासून सुटका करण्यासाठी निवेदन दिले. लोकसंख्येच्या हिशेबाने कमी पावरच्या डीपी आणि क्षमतेपेक्षा जास्तीचे लोड यामुळे येथील ट्रांसफार्मर नेहमीच जळत असल्याचे सांगत यावर उपाययोजना म्हणून लोड विभागणी करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. इंदिरानगर …
Read More »कै. दुर्गाताई कुलकर्णी म्हणजेच सेलूच्या श्यामच्या आई-. प्रा. व्ही के कोठेकर.
सेलू (प्रतिनिधी) “सेलू सारख्या अतिशय छोट्याशा शहरात साने गुरुजी कथा मालेचे रोपटे केवळ दुर्गा ताईंनी लावलेच नाही तर ते फुलवले, रुजवले. आणि सेलूच्या घराघरात श्याम निर्माण करण्याचे कार्य कै. दुर्गाताई कुलकर्णी यांनी केले. म्हणून सेलूच्या श्यामच्या आई म्हणजेच दुर्गाताई “.असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर यांनी केले. श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला येथे स्व. …
Read More »इंदिरा गांधी महाविद्यालयात शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी
पूर्णा / प्रतिनिधी – इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य धम्मानंद खंदारे यांनी साहित्यसम्राट अण्णा साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राध्यापक विष्णू गीते, जगदीश गोरे, महादेव रेनगडे, राहुल हंबर्डे, केदार जनकवाडे , सुशिल दळवी, प्रशांत वावळे,अर्चना कराळे, व सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. शाहीर अण्णा भाऊ …
Read More »विद्यार्थ्यांनी डोळसपणे करिअरची निवड करावी – मा. अशोक चोपडे
परभणी – येथील शारदा महाविद्यालयात परभणी समाचार चे संपादक, शिक्षणमहर्षी मा. हेमराजजी जैन यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी हेमराजजी जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व . हेमराजजी जैन यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. हेमराजजी जैन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे सर्व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षासाठींचे मोफत …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com