परभणी,दि.24(प्रतिनिधी) : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात गुरुवार 24 जूलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 62.38 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 934.440 दलघमी असून, यामध्ये 124.670 दलघमी हा मृत साठा आहे, तर 809.770 दलघमी जिवंत साठा मानला जातो. सद्यस्थितीत धरणात 505.104 दलघमी जिवंत साठा असून, एकूण पाणीसाठा 629.774 दलघमी इतका झाला आहे. यामुळे येलदरी धरण …
Read More »मराठवाडा
शेटे बंधुच्या दुकानावरील गोदामास मोठी आग
परभणी,दि 24 ः येथील वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनी जवळील शेटे बंधू यांच्या साईबाबा या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामास गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीने या गोदामातील साहित्य पेटले, काहीसे स्फोट झाल्याने आग भडकली.दूकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले तर आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केली.परंतु आग आटोक्यात आणि नव्हती.
Read More »संत सावता माळी महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न
रमेश बिजुले पाथरी,दि 23 ः पाथरी तालुक्यातील उमरा येथील देवी मंदिर संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी महोत्सवानिमित्त 22 रोजी देवी मंदिर उमरा येथे श्री ह भ प एकनाथ महाराज शिंदे कानसुरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या कीर्तन सेवेसाठी परिसरातील भजनी मंडळी व गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते महाराजांनी किर्तन सेवेसाठी संत सावता …
Read More »आडगाव येथे जास्तीची जमिन दाखवुन शासनाची फसवणुक केल्याची तक्रार
वसमत,ता 22 ः वसमत तालुक्यातील आडगाव येथे एकाने नऊ एकर पाच गुंठे जमिनीची कागदोपत्री नोंद दाखवत पीक कर्जासह इतर शासकीय अनुदान उचलून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार एका शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.दोन गटाची फोड करुन क्षेत्र कमी न केल्याचा लाभ उठवत हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. आडगाव रंजे येथील गट नंबर 587/01 आणि587/02न यामध्ये पांडुरंग मुंजाजी चव्हाण यांची …
Read More »जेष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी सभागृहात विधेयक मांडले आ.डॉ.राहुल पाटील
परभणी : ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण २४ तास उभे आहोत. ज्येष्ठ नागरीक मंचच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या समस्या तसेच दु:ख मी बघत आहे. शासकीय धोरणात ज्येष्ठांचे स्थान कुठे आहे याचे भान सरकारला आणून देण्यासाठीच आपण विधेयक मांडले असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले. ज्येष्ठांच्या अनेक अडचणींना वाचा फोडण्यासाठी विधानसभेत ज्येष्ठांच्याबाबत विधेयक मांडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आ. डॉ. राहुल …
Read More »अतिवृष्टीग्रस्त गावांना आ.राजेश विटेकर यांच्या भेटी, पंचनाम्याबाबत दिल्या सूचना.
परभणी,दि 22 (प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक महसूल मंडळात 21 जुलै रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने काही ठिकाणी घरात पाणी शिरले तर अनेक शेतात पाणी साचले, काही ठिकाणी बांध फुटून शेती खरडून गेली आ राजेश विटेकर आज सकाळी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन अतिवृष्टी ग्रस्त शेतीची पाहणी केली. सोनपेठ महसूल मंडळात 136 ,हदगाव 106., कासापुरी 215, …
Read More »हदगाव बुद्रुकला अतिवृष्टीचा तडाखा,प्रशासनाचे तातडीचे मदतकार्य सुरू
रमेश बिजुले पाथरी : पाथरी तालुक्यातील हदगाव बुद्रुक येथे मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ओसंडून वाहणाऱ्या लेंडी नदी व दोन्ही नाल्याच्या पाण्यामुळे इंदिरानगर भागातील सर्व घरे आणि जिल्हा परिषद शाळा तीन ते चार फूट पाण्यात गेली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीचे मदतकार्य सुरू केले आहे. हादगांव बुद्रुक येथील पूरपरिस्थितीची माहिती …
Read More »सेलू तालूक्यात दमदार पाऊस,नदीनाल्यांना पूर,सेलू पाथरी रस्ता बंद
परभणी,दि 22 ः मागील अनेक दिवसांच्या उघाडी नंतर १७ जूलै रोजी सेलू तालूक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाली होती.त्यानंतर २१ जूलै च्या मध्यरात्री संपूर्ण तालूक्यात सूरू झालेला दमदार पाऊस २२ जूलै मंगळवार सकाळी ९वाजेपर्यंत सूरूच होता त्यामूळे तालूक्यातील दूधना,कसूरा व करपरा नद्यांना पूर आल्यामूळे मंगळवारी दिवसभर तालूक्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी मध्यरात्री पासून मंगळवारी सकाळपर्यंत तालूक्यात सरासरी ५३.०६ …
Read More »भाजपा परभणी महानगरच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : ४६५ रक्तदात्यांचा सहभाग
परभणी,दि 22 ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ४६५ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. परभणी महानगर अंतर्गत कौस्तुभ मंगल कार्यालय, परभणी (चिंतामणी मंदिर मंडळ), मारुती मंदिर, असोला (परभणी ग्रामीण मंडळ) देशपांडे हॉस्पिटल, क्रांती चौक, परभणी (खंडोबा मंदिर मंडळ) ज्ञानेश्वर माऊली …
Read More »जिल्हा परिषदेत रंगला अधिकाऱ्यांचा निरोप व स्वागत सोहळा
परभणी – दिनांक 22 जुलै जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य श्वेता यादव यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद कोल्हापूर येथे झाली. तसेच डॉ संदीप घोन्सीकर यांची परभणी येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, अंकुश चव्हाण यांची उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तर डॉ संजय पांचाळ यांची जिल्हा आरोग्य अधिकारी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com