पूर्णा / प्रतिनिधी — प्रस्तावित असलेल्या रेल्वे बायपास प्रकल्पाविरोधात आज नगर परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक, स्थानिक शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम , जाकीर कुरेशी , विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.बैठकीमध्ये सर्वांनी …
Read More »मराठवाडा
भाजपा परभणी महानगर कार्यकारिणी जाहीर
परभणी,दि 31 ः भारतीय जनता पक्ष परभणी महानगरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ३१ जुलै रोजी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत परभणी महानगर जिल्ह्याचा संघटनात्मक कार्य अहवाल सादर करण्यात आला. या बैठकीत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी बुथ समिती, मंडळ समिती, शक्ती केंद्र प्रमुख तसेच प्रस्तावित जिल्हा कार्यकारिणीची सविस्तर माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष …
Read More »छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग होणार दुहेरी, २,१७९ कोटी रुपये मंजुर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘मोदी मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी २ शेतकरी आणि अन्न क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याच वेळी, ईशान्य क्षेत्रातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी चार निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून …
Read More »अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवुन देणार- शिवसेना नेते सईद खान
पाथरी,दि 30 (प्रतिनिधी)ः शिवसेना नेते सईद खान यांनी पाथरी तालुक्यातील हादगावला भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतजमिनी, घरांची पडझड, जनावरांचे हाल इत्यादी विषयी सविस्तर माहिती घेत शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन दिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार …
Read More »शिवसेनेच्या पाथरी तालुकाप्रमुखपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती
पाथरी,दि 30 प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाथरी तालुकाप्रमुखपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा धार्मिक, सामाजिक,राजकीय कामात अग्रेसर असलेले शेतकरी पुत्र एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.शिवसेना नेते सईद खान यांच्या वतीने त्यांची थेट निवड करत त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे.सर्वच क्षेत्रातील लोकांशी संबंध असल्याने एकनाथ शिंदे यांच्या या निवडीमुळे शिवसेनेला याचा निश्चितच संपूर्ण तालुक्यात फायदा …
Read More »कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने स्कूल बॅगचे वाटप
रमेश बिजुले पाथरी,दि 30 ः पाथरी तालुक्यातील कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप करण्यात आले व सर्व शिक्षण अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश बूट सॉकस वाटप करण्यात आले दिनांक 30 जुलै 2025 रोजी प्रा शा कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालय कानसुर यांच्या वतीने*इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल …
Read More »संत जीवनात आल्याशिवाय परमार्थाचा वसंत फुलत नाही-ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी
सेलू ( नारायण पाटील ) मानवाच्या जीवनात संसाररूपी सूर्याचे किरण सदैव ताप देत असतात परंतु संत सहवास झाला तर संत चंद्राचे शीतल किरण बनून आपल्याला शांत करीत असतात .कारण संत जीवनात आल्याशिवाय परमार्थाचा वसंत फुलत नाही .असे विचार ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी सेलू येथील ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेत दि २९ रोजी पाचवे पुष्प गुंफताना व्यक्त केले . शहराचे ग्रामदैवत …
Read More »विवेकानंद विद्यालयात वृक्षारोपण- दीपस्तंभ आणि आर्यवैश्य समाज व महिला मंडळाचा उपक्रम
सेलू-( प्रतिनिधी ) पर्यावरणाचे संतुलन राहावे पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी दीपस्तंभ प्रतिष्ठान,आर्यवैश्य समाज आणि सेलू महिला मंडळाच्या वतीने शहरातील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. आर्य वैश्य समाज भूषण, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ( ३० जुलै ) वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आर्यवैश्य समाज,दीपस्तंभ प्रतिष्ठान व महिला मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम वृक्षारोपण हा सामुदायिक उपक्रम तिन्ही घटकांकडून राबवण्यात …
Read More »बदलत्या ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे “वाळसरा”-लक्ष्मण गाडेकर
सेलू/प्रतिनिधी – काळ बदलला तसा ग्रामीण भागातील समाजव्यवस्था बदलली असून स्वार्थी, आत्मकेंद्री, असंवेदनशील कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले ज्याने ग्रामीण भागातील महिलांचे, मजुरांचे शोषण वाढले आहे असे मत यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमात आसाराम लोमटे यांच्या “वाळसरा” ह्या कथासंग्रहावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर होते. आजच्या …
Read More »गावकुसातल्या कलाकाराचं पेंटिंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात
पाथरी,दि 30 ः नुकतेच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांची ऐतिहासिक जागतिक वारसा म्हणून नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील वाघाळा या गावकुसातील चित्रकार सुशील घुंबरे यांनी स्वहस्ते बनवलेले रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेले कॅनव्हास पेंटिंग मंगळवार २९ जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात कॅबिनेट बैठक संपल्या नंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com