05/02/26
Breaking News

महाराष्ट्र

मोगरा कॉलनीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

परभणी,दि 11 ः परभणी शहरातील वार्ड क्रमांक १०, जुना पेडगाव रोड, रायगड कॉर्नर येथील मोगरा कॉलनीत  आयोजित पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यात शिवसेना उबाठा गटाचे रामेश्वर आवचार पाटील, शुभम कुमार तेवर, राजू अण्णा मुंजाभाऊ पांचाळ, पवन पारखे, रवी बंनचर, कृष्णा वाकडे, रवी …

Read More »

भरधाव कार कावड यात्रेत घुसली, दोन भाविकांचा मृत्यू, चार जखमी

सेलु/पाथरी,दि 11 (प्रतिनिधी) पाथरी-सेलू रस्त्यावरील खेडूळा पाटीजवळ भरधाव कार कावड यात्रेत घुसल्याने या भीषण अपघातात कावड यात्रेतील दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.११) पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. श्रावण सोमवार निमित्त सेलू येथून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे २५० कावड यात्रेकरू आले होते. मध्यरात्री रामपुरी येथे थांबून पहाटे कावड …

Read More »

मनोज जरांगे पाटील बुधवारी परभणी दौऱ्यावर

परभणी,दि 10ः संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील दिनांक 13 तारखेला वार बुधवार रोजी  सावली विश्राम गृह येथे  दिवसभर सकाळी 9 पासून परभणी जिल्ह्यातील आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते, मराठा बांधव, मराठा सेवक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर बांधव, वकील बांधव, सरपंच,उपसरपंच,जिल्हा परिषद सदस्य, सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी या सर्वांना सोबत गाठी भेटी घेणार आहेत व सर्व बांधवांसोबत चर्चा करणार आहेत तरी सर्व …

Read More »

विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व रक्षाबंधन साजरा

सेलू/प्रतिनिधी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन(९ऑगस्ट )व रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य सह शिक्षक विनोद मंडलिक यांनी स्वा.वि. दा. सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.ते पुढे म्हणाले की , स्वा. सावरकरांचे जीवन संघर्षमय होते ,अनेक क्रांतिकारकांना त्यांचे विचार प्रेरणादायी ठरले.भाषा समृद्धीसाठी त्यांनी प्रयत्न केले.मराठी ही थोर आणि प्राचीन भाषा आहे,जगाच्या …

Read More »

मराठे हिंदू नाहीयेत का? मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदू-मुस्लिम वादासंदर्भात भाष्य करताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठे हिंदू नाहीयेत का? जर जातचं संपली, तर मग धर्म कसा टिकवायचा? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ते अहिल्यानगरमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागले आहेत. आमचा …

Read More »

सेलूत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

सेलू ( प्रतिनिधी ) आज दि.९ ऑगस्ट शनीवार रोजी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुले नगर ( हमालवाडी) येथील विद्यार्थांना ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . संयोजक सुनील गायकवाड यांनी हात मदतीचा तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …

Read More »

आता बँक खात्यात किमान पाच हजार बॅलेन्स ठेवावे लागणार,आयसीआयसीआय बँकेचा नवा नियम

1 ऑगस्ट 2025 किंवा त्यानंतर उघडण्यात आलेल्या बचत खात्यांसाठी ICICI बँकेने सरासरी किमान शिल्लक (Average Minimum Balance) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. NDTV Profit ला नाव न सांगण्याच्या अटीवर एका बँक अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय प्रीमियम ग्राहकांचा वर्ग वाढवण्यासाठी घेतला आहे. मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये मासिक सरासरी किमान शिल्लक (Minimum Average Monthly Balance – MAMB) आता 50 हजार असेल ही …

Read More »

सत्तेचे हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य नाही;स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्या-पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

सेलू / प्रतिनिधी – आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते सहज मिळालेले नाही.प्रत्येक हिंदुस्थानने या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्यायला हवा.केवळ सत्तेचे हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य नाही.इंग्रजांनी आपल्याकडे सत्तेचे हस्तांतरण केले पण तेव्हा स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके काय?हे आपण समजून घेतले पाहिजे. आजही इंग्रजांच्या काळातील नियम ,कायदे पाळले जातात.इंग्रजांना जेथे कर वसुली करायची तेथे एक प्रशासन व्यवस्था असावी म्हणून पोलीस प्रशासन केले …

Read More »

कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन,दोन अधिकाऱ्यांचा होणार सन्मान…

परभणी,दि 08 ः परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ग्रामविकासामध्ये मोलाचे योगदान देणारे परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र नानासाहेब कदम यांचा परभणीमध्ये ” कृतज्ञता सोहळा”आयोजित करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये हरित ग्राम चळवळ राबविणारे आणि सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन विभाग) पदावर विराजमान असलेले ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये गावपातळीवर वाचनालय आणि ग्रामविकास उपक्रम राबविणारे …

Read More »

राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघाची रविवारी निवड चाचणी

परभणी,दि 08 ः रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने, व पुणे जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या सहकार्याने, (बालेवाडी) जिल्हा पुणे येथे २२ते २४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धा होनार असुन १७वषा वया गटातील २००८,२००९,२०१० जन्मतारीख असलेले खेळाडू व १२ वर्षे वयोगटातील २०१३,२०१४,२०१५ जन्मतारीख असलेल्या मुला-मुलींनी जन्मतारखेचा पुरावा (जन्मदाखला) तसेच खेळाडू पोशाख घेऊन दिनांक जिल्हास्तरीय 10 ऑगस्ट वार रविवार रोजी …

Read More »