04/02/26
Breaking News

महाराष्ट्र

इंदिरा गांधी महाविद्यालयात शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

पूर्णा / प्रतिनिधी – इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य धम्मानंद खंदारे यांनी साहित्यसम्राट अण्णा साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   महाविद्यालयाचे प्राध्यापक विष्णू गीते, जगदीश गोरे, महादेव रेनगडे, राहुल हंबर्डे, केदार जनकवाडे , सुशिल दळवी, प्रशांत वावळे,अर्चना कराळे, व सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. शाहीर अण्णा भाऊ …

Read More »

विद्यार्थ्यांनी डोळसपणे करिअरची निवड करावी – मा. अशोक चोपडे

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात परभणी समाचार चे संपादक, शिक्षणमहर्षी मा. हेमराजजी जैन यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी हेमराजजी जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व . हेमराजजी जैन यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. हेमराजजी जैन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे सर्व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षासाठींचे मोफत …

Read More »

सेलूत संगीतमय भागवत कथेचे आयोजन

सेलू / नारायण पाटील – पावन पुण्य श्रावणमासाचे औचित्य साधून सेलूत संगीतमय भागवत कथेचे आयोजन शास्त्री नगर मधील अष्टविनायक गणेश मंदिर मध्ये आयोजन करण्यात आले आहे . दि.२ ते ८ औगस्ट दरम्यान दुपारी २ ते सायंकाळी ६ यावेळेत भागवताचार्य ह भ प नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृतमय व रसाळ वाणी मधून या भागवत कथेचे निरूपण केले जाणार आहे .   …

Read More »

सेलू शहरात एक शाम मोहंमद रफी के नाम कार्यक्रमास प्रतिसाद

सेलू / प्रतिनिधी – सेलू शहरातील लक्की म्युझिकल ऑर्केस्ट्रा आयोजीत भारत देशाचे महान गायक मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दिनांक 31 जुलै गुरूवार रोजी सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात संध्याकाळी सहा वाजता एक शाम मोहंमद रफी के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते गोविंद भाऊ जोशी, तर प्रमूख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ …

Read More »

हात मदतीचा विद्यार्थ्यांना प्रेम देणारा उपक्रम, मिळणाऱ्या मदतीतून विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करावे-अँड हर्षवर्धन सोनकांबळे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप सेलू / प्रतिनिधी – दि.1 ऑगस्ट शुक्रवार रोजी शहरातील राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता बाल विद्यामंदिर आंबेडकर नगर येथील शाळेत स्त्रीमुक्ती स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते लोक कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या शहरातील जिजामाता बालविद्यामंदिर” येथे १ औगस्ट रोजी “हात मदतीचा ” शैक्षणिक साहित्य वाटप सामाजिक उपक्रम तुमच्या …

Read More »

रेल्वे बायपास प्रकल्पाविरोधात पूर्णेकरांचा एल्गार, मोठे जनआंदोलन उभारणार

पूर्णा / प्रतिनिधी — प्रस्तावित असलेल्या रेल्वे बायपास प्रकल्पाविरोधात आज नगर परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक, स्थानिक शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम , जाकीर कुरेशी , विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.बैठकीमध्ये सर्वांनी …

Read More »

भाजपा परभणी महानगर कार्यकारिणी जाहीर

परभणी,दि 31 ः भारतीय जनता पक्ष परभणी महानगरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ३१ जुलै रोजी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत परभणी महानगर जिल्ह्याचा संघटनात्मक कार्य अहवाल सादर करण्यात आला. या बैठकीत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी बुथ समिती, मंडळ समिती, शक्ती केंद्र प्रमुख तसेच प्रस्तावित जिल्हा कार्यकारिणीची सविस्तर माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष …

Read More »

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग होणार दुहेरी, २,१७९ कोटी रुपये मंजुर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘मोदी मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी २ शेतकरी आणि अन्न क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याच वेळी, ईशान्य क्षेत्रातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी चार निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून …

Read More »

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवुन देणार- शिवसेना नेते सईद खान

पाथरी,दि 30 (प्रतिनिधी)ः शिवसेना नेते सईद खान यांनी पाथरी तालुक्यातील हादगावला भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतजमिनी, घरांची पडझड, जनावरांचे हाल इत्यादी विषयी सविस्तर माहिती घेत शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन दिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार …

Read More »

शिवसेनेच्या पाथरी तालुकाप्रमुखपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती

पाथरी,दि 30 प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाथरी तालुकाप्रमुखपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा धार्मिक, सामाजिक,राजकीय कामात अग्रेसर असलेले शेतकरी पुत्र एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.शिवसेना नेते सईद खान यांच्या वतीने त्यांची थेट निवड करत त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे.सर्वच क्षेत्रातील लोकांशी संबंध असल्याने एकनाथ शिंदे यांच्या या निवडीमुळे शिवसेनेला याचा निश्चितच संपूर्ण तालुक्यात फायदा …

Read More »