परभणी/प्रतिनिधी जिल्हयात मागील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीपातील पिकांसहीत फळबागा आणि भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र याबाबत राज्यसरकार कुठलेही ठोस पाऊल उचलतांना दिसत नसल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. दरम्यान प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग आडविला. यावेळी दिलेल्या निवेदनात …
Read More »मराठवाडा
शारदा महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
परभणी : येथील शारदा महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्राणीशास्त्र विभागाकडून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, डॉ. भगवान पाटील व सुरेश जयपूरकर यांची विचार मंचावर उपस्थिती होती. प्रथमत: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे …
Read More »श्री शिवाजी विधी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
परभणी,दि 02 (प्रतिनिधी)ः श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी,राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालत दोन महापुरुष ज्यांनी देशाला घडविण्यात मोलाचे योगदान दिले एक म्हणजे ज्यांना “राष्ट्रपिता” म्हणून ओळखले जाते. त्यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांवर आधारलेले स्वातंत्र्य …
Read More »डोळ्यातून अश्रू…..मनोज जरांगे पाटील यांच भावनिक भाषण..
आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले. ‘शररीरात ताकद नाही. …
Read More »शारदा महाविद्यालयात गोल्डन इंग्लिश क्लबची स्थापना
परभणी – येथील शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यासाठी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात येते. यावर्षी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात आली. या क्लबचे अध्यक्ष म्हणून कु. मंजुषा पिराजी वैद्य, उपाध्यक्ष नरेंद्र रामपूरकर, सचिव कु. अंजली शिंदे, कोषाध्यक्ष विष्णू डहाळे, तसेच सदस्य म्हणून कु. सीमा क्षीरसागर, विशाल कुलदीपके, कु. …
Read More »परभणी–जालना–परभणी विशेष गाडी रोज धावणार
परभणी – दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून परभणी–जालना–परभणी दरम्यान चालविण्यात येणारी विशेष गाडी (क्र. 07663/07664) याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी 20 सप्टेंबरपासून आठवड्यातून चार दिवस (मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार) चालविली जात होती. मात्र आता दिनांक 2 ऑक्टोबरपासून ही गाडी दैनंदिन धावणार असून आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध होईल. गाडी क्र. 07663 (परभणी–जालना) …
Read More »पूर्णेत धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन – राज्य महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प
पूर्णा प्रतिनिधी / सुशिल कुमार दळवी – धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णा येथे मोठे स्वरूप प्राप्त झाले. जालना येथे मागील पंधरा दिवसांपासून संघर्षयोद्धा दीपक भाऊ बोऱ्हाडे उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ १ ऑक्टोबर रोजी पूर्णा शहराजवळील ताडकळस टी पॉइंट येथे सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यासह परिसरातील …
Read More »परभणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा
परभणी,दि 30 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रसंगी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, मुख्याध्यापक विजय शिंदे, सरचिटणीस ॲड. एन. डी. देशमुख, भालचंद्र गोरे, मंगलताई मुदगलकर, अरविंद शहाणे, मोरे सर, माने सर, दळवे …
Read More »मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते सेवानिवृत्त,कर्मचाऱ्यांनी केला सत्कार
परभणी,दि 30 (बातमीदार)ः परभणी शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते हे नियत वयोमानाने दिनांक 30.09.2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी डॉ. प्रभाकर काळदाते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक डॉ. प्रभाकर काळदाते, प्र. उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, संघटनेचे के.के. आंधळे, वसंत देशमुख, विलास भुसारे, पंकज …
Read More »दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होणार..ई-केवायसीची अट शिथील
मुंबई,दि 30 ः राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय होणार का, याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच, मॅन्यूअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com