सेलू / प्रतिनिधी – बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ए टी एम ,पी ओ एस ,इ कॉम,मोबाईल बँकिंग तसेच क्यू आर कोड सारख्या आधुनिक सुधीचा वापर करावा .असे आवाहन साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले .
साईबाबा नागरी सहकारी बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २६ जुलै २०२५ रोजी स्वामी रामानदं तीर्थ हिंदी मराठी ग्रथालंय येथे सकाळी 11वाजता संपन्न झाली. या सभेस बँकेचे सर्व सन्माननीय सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते साईबाबा च्या मूर्तीचे पूजन करून सभेची सुरुवात झाली .
यावेळी सभेच्या अध्यक्षपदी बँकेचे सस्थापक अध्यक्ष श्री हेमंत आडळकर होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर,श्री राम खराबे,,माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर, प्राचार्य डाँ शरद कुलकर्णी,श्री,डिव्ही मुळे मधुकरराव पौळ,एकनाथ पौळ,हाजी शफिख आलिखान,पुजाराम निर्वळ,संचालक श्री बालचंदानी कन्हयालाल,बिनायके प्रवीणचंद,ओम तोषनिवाल,शेख इम्रान,गगाधर आडळकर,कांचन प्रताप,माणियार सुरेंद्र, तद्यसंचालकश्री संजय मगर,मोगल भाऊसाहेब,ए टी गजमल यांची उपस्थिती होती .
बँकेचे मु का अधिकारी श्री रामराव लाडाने यांनी प्रास्ताविकात सभेपुढील विषयाची व बँकेच्याचा अहवाल सादर केला . श्री सुभाष चव्हाण यांनी अहवाल वाचन केले.
ऍड गोविद शेळके, एकनाथ पौळ, मधुकर पौळ ,हाजी शफिख अली खान, तांगडे महाराज आदीनी यावेळी मनोगत व्यक्त केले
समाजात सामाजिक कार्य करणारे हाजी शफीक आलिखान व पुंजाराम निर्वळ यांचा यथोचित शाल श्री फळ देऊन मान्यवरच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बँकेचे नफा- तोटा पत्रक व ताळेबंद २०२४/२५या आर्थिक वर्षात बँकेने रु. १ कोटी,९२लाख ९० हजार निव्वळ नफा मिळविला. या नफ्यातून कायदेशीर तरतूदी वजा जाता, संचालक मंडळाने सुचविलेला 10% लाभांश सभेने मंजूर केला सस्थेच्या अध्यक्ष यांनी सभासदांच्या सर्व शंकांचे निरसन केले मागील आर्थिक वर्षात अ वर्ग प्राप्त झाला असल्याचे सांगितले . संपलेल्या आर्थिक वर्षात बँक कडे वसूल भाग भांडवलं ६ कोटी ७२ लाख आहे, स्व निधी २६ कोटी आहे मार्च अखेर एकूण ठेवी २३६ कोटी ५२ लाख आहेत कर्ज वाटप १२७ कोटी आहेत नेट एनपीए 0% ग्रास एनपीए ९.५३३ % आहे एकूण सभासद ९४५४ आहेत सर्व शाखा नफयात आहेत व गेल्या दहा वर्षा पासून १०% लभाष वाटप करीत आहे. बँकेला १२ वेळेस बँको पुरस्कार , महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप असोसिएशन चा पद्मभूषण कै वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सह बँक पुरस्कार, बेस्ट चेअरमन पुरस्कार, बेस्ट डायरेक्टर आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .
सभेचे सूत्रसंचालन श्रीसुभाष मोहकरे यांनी केले. तर लिपिक सौ पूजा काला यांनी उपस्थितांचे आभार मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक श्री दत्ता पौळ, संतोष हुगे,पठाण निसार अविनाश आडळकर, शेख अबूजर, गुलाब सोनवणे,सुरेश आठे,आनंद मोरे,गव्हाने कैलास,विटेकर किशोर
आडळकर भास्कर,आडळकर नितीन,उमेश खरावणे,अजय मरळी,संतोष जायभाय,पारखे गोकुळ,आदी सर्व कर्मचारी यांनीपरिश्रम घेतले घेतले
Shabdraj www.shabdraj.com