23/08/26
Breaking News

बंद पडलेली पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी

सेलू( प्रतिनिधी )
येथे विद्यानगर परिसरात शालेय विद्यार्थिनींना रोडरोमिओचा त्रास होत असल्यामुळे पालक व नागरिकांच्या मागणी नुसार तिथे नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटर भागात एक पोलीस चौकी उभारण्यात आली होती .व त्यावचौकीचे उदघाटन देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात झाले होते .परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सदरील पोलीस चौकी बंद झाल्यामुळे पुन्हा रोडरोमिओचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे .त्यासाठी आज सदरील पोलिस चौकी पुर्ववत करावी .अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिस निरिक्षक श्री दीपक बोरसे यांच्या कडे करण्यात आली आहे .
यावेळी श्री पवनराजे घुमरे,राजेश वायगुंडे,एकनाथ सोळंके,गुलाबराव खेडेकर,सुशांत भैया मोगल,राहुलभाऊ जाधव,कृष्णा भाऊ वाघे आदीची उपस्थिती होती .

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …