17/07/26
Breaking News

पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्डयांवर धाडी

हिंगोली,ता 06 ः
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयात पोलीस पथकाची रवानगी केली होती.

सदर पथकाने, दिनांक 05/06/2026 रोजी, लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील शिवाजी चौक परिसरात चालू असलेल्या दोन मटका बुकींवर कारवाई करत, 24,320/- रुपयांची रोकड, 43 हजार रुपयांचे (6) मोबाईल व 48,600/- रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 1,15,920/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (6) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द निलंगा पोलीस ठाणे येथे गुरनं 232/2026 व 233/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयाअन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

तद्नंतर, मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, शिरुर अनंतपाळ येथे हॉटेल युवराज बारचे समोरील नटू लंच होम येथे छापा टाकला असता, सदर ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार खेळताना (9) इसम मिळून आले. सदर इसमांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून 28,300/- रुपयांची रोकड, 61,000/- रुपयांचे (8) मोबाईल, व 3,00,000/- रुपयांच्या (6) मोटारसायकली असा एकूण 3,89,300/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांचेविरुध्द शिरुर अनंतपाळ पोलीस ठाणे येथे गुरनं 102/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उपरोक्त तिनही कारवायांत, पोलीस पथकाने एकूण 5,05,220/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीतांविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हे नोंद केले आहेत.

‘ खबर ‘ हेल्पलाइन वरून माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …