हिंगोली, (दि. ६ ): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानात ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड १०० टक्के काढून मोहीम स्वरूपात काम करण्याचे निर्देश नुकतेच दिले त्यानुषंगाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र शेवाळा येथे 30 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढून वाटप करण्यात आले. “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानात ५९ इंडिकेटर नुसार काम करून महिना निहाय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या नोंदी रजिस्टर मध्ये घेऊन या अभियानाची गावामध्ये प्रचार फेरी काढून जनजागृती करावी जेणेकरून प्रत्येक ग्रामस्थांना या अभियानाची माहिती मिळेल आशा सूचना आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांना देण्यात आल्या.
यावेळी शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश्वर कञुवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना माने, आरोग्य सेविका बेबी नरवाडे, आरोग्य सेवक दत्ता वाघमारे, गटप्रवर्तक रेणुका देशपांडे , डाटा आपरेटर श्री.परघणे व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

Shabdraj www.shabdraj.com