18/07/26
Breaking News

मान्सून महाराष्ट्रात दाखल,वाचा 5 दिवसांचा अंदाज

मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या 5 दिवसांचा अंदाज

देशभरात नैऋत्य मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू आहे.केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर त्याने आता तळ कोकणात प्रवेश करून महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासांत मान्सून अजून पुढे आगेकूच करणार आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात शनिवार 6 जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वाटा सुटेल.

7 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात रविवार 7 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा सुटेल.

8 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात सोमवार 8 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वाटा सुटेल. तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

9 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात मंगळवार 9 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वाटा सुटेल.

10 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात बुधवार 10 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वाटा सुटेल.

Check Also

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार. दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर …