04/02/26
Breaking News

सेलूत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

सेलू ( प्रतिनिधी )
आज दि.९ ऑगस्ट शनीवार रोजी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुले नगर ( हमालवाडी) येथील विद्यार्थांना ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
संयोजक सुनील गायकवाड यांनी हात मदतीचा तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माझी सैनिक विठ्ठल सिंह ठाकुर, पद्माकर वाकडिकर, अभियंता सुयश नाईकवाडे, संयोजक सुनील गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालूका अध्यक्ष सतिश जाधव, निर्मिक क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे, देवेंद्र आन्ना कुरा,मुख्याध्यापक भुजंगराव थोरे उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गायकवाड सूत्रसंचालन भुजंगराव थोरे तर आभार प्रशांत महाराज चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …