17/07/26
Breaking News

हिंगोलीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी 

हिंगोली,दि 25
राज्यस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा ७ वर्षाखालील मुले व मुली30/ 31मे पुणे येथे ०९ वर्षाखालील मुले व मुली ०२/०२ जुन छत्रपती संभाजीनगर ११ वर्षाखालील मुले व मुली १३ वर्षाखालील मुले व मुली ०५ व ०७ जून सोलापूर येथे विविध गटाच्या स्पर्धा होणार आहे.  दिनांक 24 मे 2026 रविवार रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे निवड चाचणी घेण्यात आली.

निवड चाचणीला प्रमुख उपस्थिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर  व बुद्धिबळ संघटनेचे जिल्हा सचिव , एम ए बारी  उपस्थित होते व तसेच निवड चाचणी आयोजन शेख रहीम  व प्रकाश अडकिने  वसमत तसेच हिंगोली येथील बेले व बजरंग कदम (संचालक शंभूराजे स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोली) यांनी सहकार्य केले व निवड चाचणीला पालक सुद्धा उपस्थित होते निवड चाचणीमध्ये जिल्ह्याचा संघ खालील प्रमाणे निवड करण्यात आली७ वर्षाखालील मुली:- १)जुनेरा फातिमा शेख मोहसीन मुले :-९) वर्षा खालील मुले १) संभाजी शेळके२) हर्ष साबळे मुली:-१) संस्कृती सोळंके२) ११ वर्षाखालील वयोगट मुले:-१) कार्तिक कैलास बेले मुली:-१) देवांशी नामदेव चापके २) श्रद्धा शिवाजी साबळे तेरा वर्षे वयोगट मुले:-१) जय नामदेव पवार २)वेदांत विनोद कुंदर्गे ३)कुणाल शेळके ४)वेद रोहित देशपांडे ५)अहमद शेख मोहसीन ६)शिवराज सोळंके निवड करण्यात आली. खेळाडूंना प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर  व जिल्हा सचिव एम.ए बारी यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी बॉक्सिंग संघटनेचे जिल्हा सचिव फिरोज पठाण  व एकता फाउंडेशन चे संचालक गजानन आडे  यांनी विजयच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …