17/07/26
Breaking News

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात गंगाखेडमध्ये औषध विक्रेत्यांचा एल्गार

रामप्रसाद ओझा | प्रतिनिधी, गंगाखेड
ऑनलाइन औषध विक्रीच्या बेजबाबदार धोरणांविरोधात गंगाखेड शहर व तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी (दि. २० मे) कडकडीत बंद पाळत शासनाला ठाम इशारा दिला. शहरातील सुमारे १५० औषधी दुकाने पूर्णतः बंद ठेवून औषध विक्रेत्यांनी आपला रोष उघडपणे व्यक्त केला.
हा बंद अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत पाळण्यात आला. गंगाखेड केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.
“ऑनलाइन औषध विक्री म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळ!”
इंटरनेट फार्मसी, ई-पोर्टलच्या माध्यमातून झोपेची औषधे, गर्भपाताची औषधे, नशेची औषधे बिनधास्त विकली जात आहेत.
.यामुळे दुष्परिणाम झाले तर जबाबदार कोण?
. ऑनलाइन औषधे विकणारा केमिस्ट कोण?
रितसर केमिस्टवर कडक नियम, पण ऑनलाइन विक्रीला मोकळीक – ही दुहेरी भूमिका का?
हा थेट सवाल औषध विक्रेत्यांनी शासनाला केला आहे.
प्रमुख मागण्या – निर्णय मागे घ्या!
जीएसआर ८१७(इ) दिनांक २८ ऑगस्ट २०१८
कोविड काळातील जीएसआर २२०(इ) दिनांक २६ मार्च २०२०
हे दोन्ही निर्णय तात्काळ रद्द करावेत, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.
या संदर्भात गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना दि. १८ मे रोजी लेखी निवेदन देण्यात आले असून, नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या निवेदनाची प्रतही प्रशासनाला सादर करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सहकार्य
बंद असला तरी अत्यावश्यक वैद्यकीय गरजांसाठी संघटनेचे पदाधिकारी सहकार्य करतील, असे स्पष्ट करत जनतेच्या आरोग्याबाबत आपली जबाबदारी औषध विक्रेत्यांनी अधोरेखित केली.
ह्यावेळी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या
जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गुंडाळे, तालुकाध्यक्ष संदीप कोटलवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नंदकुमार भरड, शहराध्यक्ष कारभारी निरस, उपाध्यक्ष राधाकृष्ण राखे, सचिव अक्षय जैन, कोषाध्यक्ष बालाजी गुंडाळे, अनिल कलकोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

“जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रीवर तात्काळ पायबंद घाला, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू,” असा इशारा गंगाखेडमधील ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी दिला आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …