हिंगोली,दि 20 (प्रतिनिधी)
हिंगोली शहररतील एन.टी.सी भागातील भगवान महावीर गार्डन येथे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दिवस असो वा रात्र, तासनतास वीज गुल होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे महावितरण कंपनीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांमधून केला जात आहे. दिनांक 19 मे च्या मध्यरात्री महावीर गार्डन येथील ट्रान्सफार्मरने अचानक पेट घेतला तेव्हा परीसरातील शुभम मुंदडा, रामदास बकरे, अमोल कान्हेड, नाना बांगर, डॉ.नितिन कुटे, प्रसाद ढोके, श्रीकांत कान्हेड, आकाश कटारीया यांनी तत्परता दाखवत आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने कंट्रोल रुमला फोन करुन माहिती दिली व महावितरण कर्मचारी दत्ता अंभोरे यांनी व नागरीकांनी अथक परीश्रमाने आग विझवली. वीज बिल भरूनही नागरिकांना या नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. महावितरणने आपला कारभार सुधारावा आणि तात्काळ अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. तसेच परीसरात विजेचा भार अधिक असल्याने जास्त क्षमतेची डी.पी टाकण्यात यावी अशी मागनी नागरीक करत आहेत. अन्यथा अंदोलनाचा इशारा नागरीकांनी दिला आहे.
तात्पुरती डागडुजी
अनेकदा तक्रार करुनहि डि.पी बदलुन द्यावी अशी मागनी करुन देखील नेहमीच तात्पुरती डागडुजी करुन चालढकलपणा महावितरणचे अधिकारी करतात असे येथील नागरीकांचे म्हणने आहे.
अखेर… रात्री दोन वाजता केली दुरुस्ती
आगीमुळे विजपुरवठा करणारे वायर्स जळाल्याने रात्री दोन वाजता नविन वायर्स मागवुन टाकण्यात आले. यावेळी महावितरणचे अभियंता सचिन बेलसरे, दत्ता अंभोरे, विनायक पांडे, प्रदिप भुक्तर, रवी ढाकरे, संतोष माकणे यांनी दुरुस्ती करुन सेवा पुर्ववत केली.
Shabdraj www.shabdraj.com