परभणी – बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले.
शुक्रवार दि. 04 जुलै 2025 रोजी पाथरी तालुक्यातील वडी या ग्रामपंचायती मध्ये माझं गाव माझं योगदान उपक्रमांतर्गत गावकऱ्यांच्या लोकसहभागातून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या सरपंच सौ सुशीलाताई खंडागळे, उपसरपंच सिद्धेश्वर शिंदे,
शालेय समिती अध्यक्ष कृष्णकुमार शिंदे, माजी सरपंच शिवाजीराव कुटे, माजी उपसरपंच प्रतापराव शिंदे, प्रा. एस एस शिंदे, सोमेश्वर शिंदे, ग्रामविकास अधिकारी, प्रभाकर खेत्री, मुख्याध्यापक संजय चिंचाणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शा.व्य. समिती सदस्य, सर्व शिक्षक, ग्रा.पं.कर्मचारी गोपाळ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गावातील प्रमुख ठिकाणी वड, पिंपळ, जांभूळ, पेरू, आंबा, अशा विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. ओमप्रकाश यादव यांनी गावातील नागरिकांना फळबाग, आधुनिक शेती, तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि बांधावर मोकळ्या जागेत वृक्षरोपन करुन गावकऱ्यांना वृक्ष लागवडीचा संकल्प देऊन दत्तक घेत असलेल्या वृक्षांचे संगोपन करण्या बाबत आवाहन केले. यावेळी त्यांनी पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी या ठिकाणी भेट देऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. शाळेत काही वर्गांना भेटी देऊन अधिकारी होण्यासाठी विध्यार्थ्यांशी दिलखुलास सवांद साधला. विध्यार्थी गुणवत्ता आणि शिस्त तसेच भौतिक सुविधा, आणि शालेय परिसर पाहून समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद शाळेतूनच शिकून माझ्यासह अनेक अधिकारी घडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता परिश्रम केले पाहिजे.
ओमप्रकाश मं. यादव
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा)
जिल्हा परिषद, परभणी.
Shabdraj www.shabdraj.com