गंगाखेड ता.27
गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड -पालम तसेच गंगाखेड- राणीसावरगाव रस्ते वाहतूक बंद झाली आहे.
गंगाखेड, पूर्णा,पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती गंभीर होत आहे.
पोलीस ठाणे चुडावा हद्दीत पूर्णा ते नांदेड रस्त्यावरील मौजे चुडावा गावाजवळ पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. प्रशासनाने योग्य बंदोबस्त लावला आहे. अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
चुडावा तालुका पूर्णा येथे पाण्याच्या टाकीवर एक व्यक्ती पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. नगरपालिका महसूल व पोलीस पथक पूर्णा तालुक्यातील सदर व्यक्तीला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
नाव्हा तालुका पालम व पालम शहरातील काही व्यक्तींना घरात पाणी गेल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
शेख राजुर येथे पुराच्या पाण्यामध्ये दोन व्यक्ती अडकलेले आहेत. सदर व्यक्तींना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चुडावा येथे पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर सुखरूप काढण्यात आले आहे.
शेख राजुर तालुका पालम येथे शेतात अडकलेल्या दोन व्यक्तींना पुरातून सुखरूप बाहेर काढून नदीच्या पलीकडील भागात सुरक्षित अंतरावर ठेवले आहे. गुळखंड जवळा येथे पुराचे पाणी गावात आले आहे. ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज डाफकर यांनी दिली
Shabdraj www.shabdraj.com