04/02/26
Breaking News

 इंद्रायणी देवी दर्शनासाठी महिला भावीकांसाठी मोफत बससेवा,माणिक पोंढे यांचा उपक्रम

परभणी,दि 27 ः
नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेत इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी माता-भगिनींची भाविक यात्रा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे पाटील व जयश्री पोंढे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. या मंगलप्रसंगी अंबाबाईचा उदो उदो करत परिसरातील अनेक भगिनींना इंद्रायणी देवीच्या दर्शनाचा योग आला.

ही यात्रा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महाराष्ट्राचे युवा नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच मराठवाडा संपर्कप्रमुख व माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदभाऊ भरोसे यांच्या हस्ते श्रीफळ वढवून भगिनींचा प्रवास प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितींमध्ये प्रवीण देशमुख, बाळासाहेब पानपट्टे शेख शब्बीर शिवसेना महिला आघाडीच्या गीताताई सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, रामा कुलथे बाळू मोटे अनुराधाताई टाक, यांचा समावेश होता. तसेच आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून भगिनींना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखाप्रमुख प्रल्हाद आपशिंदे, अशोक गिराम, आकाश सुरजजोसे, सौरभ टाक, शिवाजी गंडे, अनिल लोंढे, विजय मंडलिक, सचिन पवार नीरज बुचाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक माता-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने भरलेल्या या यात्रेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. माता-भगिनींनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि धार्मिक श्रद्धेचे सुंदर दर्शन घडले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …